सातारा : लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार जोरदार सुरू आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीने छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीने आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही बाजूंनी प्रचार सुरू असून खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांनीही प्रचार सुरू केला आहे.
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी विधानसभा मतदारसंघात दौरे वाढवले आहेत. महिलांचे मेळावे सुरू आहेत. काल कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मेळावा झाला. यावेळी छत्रपती दमयंतीराजे भोसले यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
"उदयनराजे काँग्रेससोबत असताना काँग्रेसला नेहमी भीती असायची की, उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. हे कुटुंब राजकारणात पुढे आले तर आमचे काय होणार? म्हणून काँग्रेसने उदयनराजेंना नेहमी बाजूला ठेवले, असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी काँग्रेसवर केला.
दमयंतीराजे भोसले म्हणाल्या, उदयनराजेंनी आतापर्यंत खूप परिश्रम घेतले आहे, त्यांच्यासाठी काही सोपं नव्हते. उदयनराजे राजकारणात पुढे गेले तर कोणी थांबवू शकणार नाही अंस काँग्रेसला वाटायचे, असंही दमयंतीराजे म्हणाल्या. काँग्रेसने त्यांना नेहमी सोबत घेतले पण मागेच ठेवले. आमच्या परिवाराने लोकांसाठीच काम केलं आहे. उदयनराजेंनाही हीच शिकवण आहे, त्यांना तुमची सेवा करायची आहे. उदयनराजेंनी मागच्यावेळी लगेच राजीनामा दिला होता, त्यावेळी मलाही कळालं नव्हतं. मतदारसंघातील कामासाठी त्यांनी पद सोडले. भाजपा एक विकासाचा गट आहे, आता महायुतीमध्येही त्यांना ऑफर होत्या पण त्यांनी भाजपा सोडली नाही. भाजपामधून आपली जास्त काम होतील, असंही दमयंतीराजे भोसले म्हणाल्या.
मेळाव्यांवर भर..
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंती राजे भोसले यांनीदेखील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दौरा, बैठकांचा धडाका सुरू केला आहे. मतदारसंघात त्यांनी आतापर्यंत वीस मेळावे घेतले आहेत. महिला व तरुणींशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणीदेखील त्या जाणून घेत आहेत.
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |