10:14pm | Apr 19, 2024 |
सातारा : माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या पक्षाचे अभय जगताप यांचे बंड शमविण्यात पक्षाला यश आले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची समजूत काढल्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माढ्यात महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभय जगताप यांनी उमेदवारी भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, खासदार शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची समजूत काढली. तसेच त्यांना भविष्यात संधी दिली जाईल, असाही शब्द अभय जगताप यांना दिला आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच बंडाचा पवित्रा घेतलेले अभय जगताप यांचे बंड थोपविण्यात शरद पवार व जयंत पाटील यांना यश आले आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या ताकदीत वाढ झाली असून, महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
यासंदर्भात अभय जगताप म्हणाले, राष्ट्रवादीत दुफळी निर्माण झाल्यानंतर अनेकांनी त्यांची साथ सोडली आहे. पण अशा वाईट परिस्थितीत खासदार शरद पवारसाहेबांना एकटे सोडणार नाही. त्यांच्याबद्दल असणारी निष्ठा आम्ही कायम ठेवणार आहोत. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी आमची ताकद लावणार आहोत. जातीयवादी भाजपला रोखण्यासाठी आम्ही सदैव शरद पवार यांच्यासोबत राहणार आहोत. जयंत पाटील यांनी माढा लोकसभेचा सर्व्हे केला होता. यामध्ये मोहिते पाटील यांचे नाव आघाडीवर होते. त्यामुळे त्यांनी माझी समजूत काढली असून, मला आणखी काम करण्याची गरज आहे.
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |
भाजप 150 वर जाऊ शकणार नाही : बाबुराव माने |
बारा मावळातर्फे उदयनराजे यांना पाठिंबा |
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |