RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

उदयनराजेंची जोतिबा येथे भेट

18 February 2019 at 17:15

कोल्हापूर : पुजारी समाजाच्या मागण्या निश्चित मार्गी लावू असे आश्वासन खा. उदयनराजे भोसले यांनी तीर्थक्षेत्र जोतिबा डोंगरला सदिच्छा भेटीवेळी दिले. खा. उदयनराजे म्हणाले, ज्या घरांन्याचा आम्ही वारसा सांगतो. त्याचा वसा पुढे घेऊन जात असताना ज्या काळात शिवाजी महाराजानी कोणावर अन्याय होऊ दिला नाही. त्याच प्रमाणे आपणही कोणावर अन्याय होऊ देणार नाही. पुजारी समाजाच्या मागण्या मार्गी लावण्यात मी कमी पडणार नाही. माज्या हातुन आपली जास्ती जास्त सेवा घडावी अशी ईच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

जोतिबा डोंगरावर सांयकाळी ६ वाजता खा. उदयनराजे यांचे आगमन झाले. प्रथम शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार घालुन जोतिबा मंदिरात प्रवेश केला. जोतिबा मंदिरात पुजारी समाज व देवस्थान समितीच्या वतिने स्वागत करण्यात आले. सनई चौगडा वाजवून राजेशाही पध्दतीने स्वागत करण्यात आले. खा. उदयनराजे यांनी दख्खनचा राजा श्री. जोतिबा दर्शन घेतले. सेंट्रल प्लाझा या ठिकाणी जोतिबा देवाची भाविक भक्तांना समग्र माहीती देणारी वेबसाईट व अ‍ॅप्लिकेशन, जोतिबा देवाची राजमुद्रा अनावरण खा. उदयनराजे यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी संजय आमाणे, राहुल मिटके, माजी सरपंच शिवाजी सांगळे, उपसरपंच जगन्नाथ दादर्णे, देवस्थान समिती सदस्या संगीता खाडे, के.डी.सी. संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, लखन लादे, रघुनाथ ठाकरे आदि सह ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाआघाडीतल्या ५६ पक्षांच्या पराभवासाठी महायुतीचे पाच पांडव पुरेसे : मुख्यमंत्री

महाराष्ट्रात बोलघेवडे लोक खूप आहेत त्यातच हल्ली बारामतीचा पोपट खूप बोलू लागला आहे आमचे कपडे कोणीच काढू शकणार नाही पण तुमच्या अंगावर आता काही शिल्लकच राहिले नाही

16 hours before

धक्कादायक ! पत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सहसचिवाची आत्महत्या

मंत्रालयीन सहसचिवाने आपल्या पत्नीवर गोळीबार करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंत्रालयात सहसचिव पदावर कार्यरत असलेल्या विजय पवार यांनी घरगुती वादातून गुरुवारी रात्री पत्नीवर २ गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या

22 March 2019 at 16:05