09:40pm | Apr 25, 2024 |
सातारा : सातारा पोलीस दलाने राबवलेल्या उंच भरारी या योजनेला जिल्ह्यात चांगले यश मिळत असल्याने जिल्ह्यातील पोलीस पाटलांना बोलावून त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल तसेच इतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून कलाकारांना बोलावून त्यांच्या माध्यमातून उंच भरारीचे आणखी काम जोमाने सुरु ठेवले जाणार आहे.
सातारा जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगार मिळावा, गुन्हेगारीकडून त्यांचे लक्ष वळवून त्यांना मुख्य प्रवाहात आणावे, यासाठी सातारा पोलिसांनी दीड वर्षापूर्वी उंच भरारी ही योजना आणली. आतापर्यंत जिल्ह्यातील 760 युवक-युवतींना हॉटेलिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिशियन, प्लबिंग, वेल्डींग याचे सातारा पोलीस दलाच्यावतीने मोफत प्रशिक्षण देण्यात आले आहे. साधारण तीन महिन्यांपर्यंतचे हे प्रशिक्षण कोल्हापूर, अहमदनगर या ठिकाणी देण्यात आले आहे. प्रशिक्षणानंतर युवकांना नोकरीही देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी सातारा पोलिसांनी पोलीस पाटील तसेच ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून कलाकारांना बोलावून त्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तसेच ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून महिलांमध्ये अभिनेत्री मोनिका राठी तसेच पुरुषांमध्ये युट्यूबर, स्टोरीटेलर, कंटेन्ट क्रिएटर सौरभ भोसले यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्यातील युवकांनी या उंच भरारी या योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |