07:39pm | Apr 25, 2024 |
सातारा : सातार्याची छत्रपती शिवरायांची गादी महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा सन्मान आहे. हा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी छत्रपतींचे वंशज असणार्या खासदार उदयनराजे भोसले यांना मतदारांनी निवडून द्यावे, असे आवाहन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी पत्रकार परिषदेत केले.
सातार्यातील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, इंग्रजीवर प्रभुत्व असेल तर देशाचे विधिमंडळ असणार्या संसदेत आपली बाजू ठामपणे मांडता येते. उदयनराजे यांचे व्यक्तिमत्व देश पातळीवर सर्वमान्य आहे. चर्चेत सहभागी होऊन कोणत्याही विषयाला पूर्णत्वाला नेण्याची त्यांची हातोटी आहे. जेव्हा निवडणुकीला राजा उभा असतो तेव्हा सामान्यांच्या मनात एक निश्चित आदराची भावना असते. त्यामुळे 80 टक्के लोकांनी निर्णय दिलेला आहे.
मागच्या वेळी पावसामुळे थोडासा चुकीचा संदेश गेल्यामुळे नुकसान झाले. परंतु यावेळी मतदारराजा म्हणतोय, जिल्ह्याची कमान महाराज चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात. महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली येणार्या काळात सातारा जिल्ह्यात औद्योगीकरण चांगल्या पद्धतीने होऊन येथील स्थानिक तरुणांना रोजगार निश्चित मिळेल, असा ठाम दावा त्यांनी केला.
सातार्याची छत्रपतींची गादी हा महाराष्ट्राचा तसेच देशाचा सन्मान आहे. तो अबाधित राखण्यासाठी उदयनराजे यांना संसदेत मतदारांनी विक्रमी मताने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. मोदी सरकारची 400 पार ही घोषणा अस्तित्वात येण्यासाठी सातार्यातून उदयनराजे भोसले निवडून जाणे फार गरजेचे आहे. सातारा जिल्ह्यात उदयनराजे यांच्यासाठी वातावरण चांगले आहे. राजेंची कॉलर त्यांना निवडून देऊन ताठ ठेवा. त्यासाठी उदयनराजेंना यावेळी एकतर्फी भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन करायला यशवंत भाऊ विसरले नाहीत.
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |
दिव्यांग बांधवांचा लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार |
तुतारी आणि ट्रंपेट मधील फरक उमजेना ! |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |