अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत असल्याची घोषणा आज केली. अकोले येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. ३० किंवा ३१ जुलैला त्यांचा भाजपात प्रवेश होणार असून त्यानंतर १७ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांची अकोलेत सभा होणार आहे.
अकोले येथे आज पिचड समर्थकांचा मेळावा झाला. राष्ट्रवादीच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी कालच राजीनामे दिले आहेत. या मेळाव्यात बोलताना माजी मंत्री पिचड म्हणाले,
आपल्यावर अनेक राजकीय वार झाले. व्यक्तिगत टीकाही झाली. मात्र, आपला कोणावरही राग नाही. आतापर्यंतच्या राजकारणात शरद पवार यांची मोठी साथ मिळाली. मात्र, आता देश बदलला आहे. वातावरण बदलत आहे. विकासाच्या बाजूने जायचे की प्रवाहाच्या विरोधात, हा प्रश्न होता. मात्र, आता आम्ही विकासाच्या बाजूने जायचा निर्णय घेतला आहे. आता मला राजकारणात काहीही मिळवायचे नाही. यापुढे कोणतीही निवडणूक मी लढविणार नाही. भाजप प्रवेशाचे ठरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची मनमोकळी चर्चा झाली. अन्य नेत्यांसोबतही चर्चा झाली. गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील प्रत्येकवेळी आमच्यासोबत होते.
आमदार पिचड म्हणाले, अकोल्याच्या विकासासाठी प्रयत्न करीत होतो. मात्र, मागील पाच वर्षांत फक्त तीन किलोमीटरचा रस्ता करू शकलो. विरोधी पक्षात राहून काम करता येणार नाही हे यावरून कळले. त्यामुळे पक्ष बदलायचा आहे. मनात प्रचंड वेदना होत आहेत. भाजपची कामाची पद्धत आवडली. त्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास होईल, म्हणून आपण भाजपात जात आहोत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |