02:09am | Jan 11, 2020 |
उस्मानाबाद : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची डोकी फुटत असतील तर आम्ही मुळीच शांत बसणार नाही. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मारहाण करणं हे कोणत्या संस्कृतीत बसतं? तसंच दाभोलकर, गौरी लंकेश यांना ठार करण्यात आलं ही कोणती भारतीय संस्कृती आहे? असे प्रश्न उपस्थित करत ९३ व्या अखिल भारतीय संमेलानाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांनी आपल्या भाषणात सद्यस्थितीवर भाष्य केलं. JNU मधील हिंसाचारात काही विद्यार्थी जखमी झाले. त्याचा उल्लेख त्यांनी भाषणात केला. तसंच अशा घटनांबाबत गप्प बसणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. आजचे प्रश्न कोणते? असा मला प्रश्न पडतो. कधी कधी मूलतत्त्ववाद बरा वाटतो. देशात वाढत चाललेली बेरोजगारी, बंद पडत असलेले उद्योग आणि ढासळत असलेली अर्थव्यवस्था हे मुख्य प्रश्न आहेत असं म्हणत त्यांनी याबाबतची खंतही व्यक्त केली.
दिब्रिटो म्हणाले की, मी प्रभू येशूचा उपासक आहे, प्रभू म्हणतात की, त्यांना माफ कर त्यांना माहीत नाही ते काय करत आहेत. मी संताना मानणारा आहे. जो मराठी आहे त्याला संतांची गोडी लागलीच पाहिजे. मी संतांना विसरू शकत नाही, विशेषतः मी माझ्या लाडक्या तुकोबाला विसरु शकत नाही.
सध्या देशात सुरु असलेल्या गोष्टींकडे पाहिलं की प्रश्न पडतो की,आपण भुतांच्या प्रदेशात राहतो की माणसांच्या? लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांना मारहाण करत असाल, तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा दिब्रिटो यांनी यावेळी दिला.
यावेळी त्यांनी वाचन संस्कृती ढासळत असल्याच्या मुद्द्यावरही चिंता व्यक्त केली. ” मला गौतम बुद्ध वाचून आयुष्याची प्रेरणा मिळाली. वाचनामुळे आपण प्रगल्भ होतो. आपल्या वाचन संस्कृतीचा विकास झाला पाहिजे. अनेक पालकांना आजच्या घडीला वाटतं की इंग्रजी ही धनाची भाषा आहे. ती धनाची भाषा असेल पण लक्षात ठेवा मराठी ही मनाची भाषा आहे.” असंही दिब्रेटो म्हणाले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |