मुंबई : मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस यांना आपल्या खासगी गाडीवर 'पोलीस' अशी पाटी लावता येणार नाही, असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. अशी पाटी लावलेल्या गाडीवर यापुढे कारवाई केली जाणार आहे.
अनेक पोलिसांच्या खासगी गाडीवर 'पोलीस' अशी पाटी लावलेली असते. मात्र अनेकदा याचा वापर कारवाईपासून वाचण्यासाठी केला जातो. आता यापुढे गाडीवर मुंबई पोलीस किंवा वाहतूक पोलिसांचा लोगो लावता येणार नाही. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 2013 च्या कलम 134 प्रमाणे यावर कारवाई करण्यात येणार आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर वाहतूक पोलिसांना येत्या 7 दिवसात कुणावर कारवाई केली याचा अहवाल वाहतूक मुख्यालयाला सादर करायचा आहे. त्यामुळे येत्या काही काळात अशी कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस सक्रिय झाल्याचं पाहायला मिळेल.
न्यायाधीशांसाठीही नियम
न्यायाधीशांनाही आपल्या खासगी वाहनांवर 'न्यायाधीश. असं लिहिता येणार नाही. याबाबत मुंबई हायकोर्टाने परिपत्रक काढलं आहे. दरम्यान, अनेक पोलिसांच्या खासगी वाहनांवर नावाचा आणि पोलिसांच्या लोगोचा उल्लेख असतो. याचा वापर करून काही जणांकडून नियमांची पायमल्ली केली जाते. असे प्रकार रोखण्यासाठी हायकोर्टाने हा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |