RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

पोलिसांवर हल्‍ला प्रकरण : मटका बुकीच्या ४ साथीदारांना बेड्या, रिव्हॉल्‍व्हर हस्तगत

10 April 2019 at 15:07

कोल्‍हापूर : प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पोलिस पथकावर झालेल्या हल्लाप्रकरणी पोलिसांनी मटका बुकी सलीम मुल्ला याच्या आणखी चार साथीदारांना बुधवारी पहाटे बेड्या ठोकल्‍या. तसेच सुरक्षा रक्षक निरंजन पाटील यांच्याकडून पळवून नेलेले सर्विस रिव्हॉल्‍व्हर हस्तगत केले आहे. 

दोन दिवसांपूर्वी यादव नगरात ही थरारक घटना घडली होती. सहायक पोलिस अधीक्षक शर्मा या सोमवारी रात्री आठच्या सुमारास सहा पोलिस कर्मचाऱ्यांसह पांजरपोळ येथील मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेल्या होत्या. 'इंडियन ग्रुप' या इमारतीमागे असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकून त्यांनी चार संशयितांना ताब्यात घेतले. अड्डामालकाविषयी विचारले असता, तरुणांनी शमा मुल्ला यांचे पती सलीम मुल्ला याचा मटका अड्डा असल्याचे सांगितले. यानंतर शर्मा या दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह जवळच असलेल्या मुल्ला यांच्या घरात गेल्या. पोलिस आल्याचे लक्षात येताच मुल्ला यांनी आरडाओरडा करून गोंधळ घातला. या प्रकाराने गल्लीतील नागरिकही जमा झाले. यातील काही तरुणांनी पोलिसांवर हल्ला चढवला. शर्मा यांच्या रक्षक कर्मचाऱ्याकडील पिस्तूल हिसकावून घेऊन ते शर्मा यांच्यावर रोखले. या प्रकाराने पोलिस घाबरले. मात्र, दहा ते पंधरा मिनिट गोंधळ सुरू असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. दरम्यान, पोलिसांकडून हिसकावलेले पिस्तूल घेऊन तरुणांनी पळ काढला.

सहायक अधीक्षक शर्मा यांनी मोबाइलवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देताच राजारामपुरी, एलसीबी, लक्ष्मीपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्यासह १३ जणांना ताब्यात घेतले. अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी घटनास्थळी आले. यानंतर राजारामपुरी पोलिस ठाण्यात जाऊन त्यांनी संशयितांची चौकशी सुरू केली. पळून गेलेल्या संशयित हल्लेखोरांची धरपकड करण्यासाठी रात्रभर पोलिसांनी शोधमोहीम राबवली. चौघांना ताब्यात घेतल्यामुळे अटक झालेल्यांची संख्या 25 झाली आहे. मुख्य संशयित सलीम मुल्ला अजूनही फरार आहे. त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण राजारामपुरी पोलिस ठाण्याची पतके ठिकठिकाणी रवाना झाली आहेत. लवकरच सलीम मुल्लाला अटक केली जाईल, असे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितले.


धक्कादायक !

केंद्रीय मंत्री रामदास आठवले माझे वडील असून 34-35 वर्षांपूर्वी ते घर सोडून गेले होते. ते माझे वडील आहेत, अशा प्रकारची पोस्ट उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर येथील राजकुमार या युवकाने फेसबुकवर टाकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

yesterday

‘वंचित आघाडीचं बटण दाबलं तरी कमळालाच मतदान ; जिल्हाधिकाऱ्यांनी सील केल्या मशीन

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएमबाबत माध्यमांसमोर गंभीर आरोप केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हासमोरील बटण दाबले तरी मतदान कमळालाच होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

18 April 2019 at 17:12

बीडमध्ये माझ्या नावाचा वापर करून मतदारांची दिशाभूल केली जातेय : खा. उदयनराजे भोसले

बीड लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा वापर करत प्रितम मुंडे यांना पाठींबा देणारे बॅनर लावले आहे. यावर उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

18 April 2019 at 03:06