01:12am | Apr 17, 2018 |
मुंबई : राज्यातील कंत्राटी कर्मचारी यांच्या प्रश्नावर शासनाने अद्याप तोडगा काढलेला नाही. कत्रांटी कर्मचारी यांना सेवेत कायम व समान वेतन समान काम या मागणीसाठी येत्या २३ एप्रिल रोजी मुंबईत मुख्यमंत्री यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा राज्य शासकीय कंत्राटी कर्मचारी महासंघांचे अध्यक्ष मुकूंद जाधवर यांनी दिला आहे. राज्यातून महिला व पुरूष कर्मचारी असे एक लाख लोक या धरणे आंदोलनासाठी येणार असून 1 मे महाराष्ट्र दिना पासून काम बंद आंदोलन करणेत येणार आहे.
संघटनेने आझाद मैदानावर आंदोलन केले होते. त्यानंतर राज्यमंत्री येरावार यांचे समवेत बैठक घेणेत आली होती. अद्याप याबाबत ठोस निर्णय न झालेने संतप्त कर्मचारी आपल्या न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्री यांचे वर्षा बंगल्या समोर ठिय्या धरणे आंदोलन करणार आहेत.
राज्यात शासकीय कंत्राटी कर्मचारी यांची पिळवणूक सुरू आहे. दररोज शासन वेगळा निर्णय घेत आहे. अनेक विभागातून कंत्राटी कर्मचारी यांच्या सेवा खंडीत करणेत येत आहेत.
मुंबई येथे २३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मलबार हील वरील वर्षा बंगल्या समोर जवाब दो आंदोलन करणेत येणार आहे.
राज्यात जिल्हास्तरावर दि. १८ ते २२ एप्रिल या कालावधीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देणेत येत आहे. त्यानंतर शासनाचे सर्व विभागास व मुख्यमंत्री यांचे कार्यालयास निवेदन देणेत आले आहे.
राज्याव्यापी या आंदोलनासाठी राज्यातील ७१ पेक्षा अधिक कर्मचारी संघटना यामध्ये सहभागी होत आहेत. आरोग्य विभागाच्या १०२ चे वाहन चालक या संपात सहभागी होत आहेत.
राज्यात सर्व विभागात शासनाने विहित पध्दतीद्वारे निवड केलेल्या व सध्या काम करीत असलेल्या पदावर त्याची शैक्षणिक अह्रता आणि अनुभव लक्षात घेऊन तिची विभागातील रिक्त पदावर तसेच नेमलेल्या मान्य पदावर समायोजित करणेत यावे. राज्यातील सर्व कंत्रांटी कर्मचारी यांचे सेवा नियमित करणेत यावेत. मा. सर्वोच्च न्यायालयाने जगजितसिंग व इतर विरूध्द पंजाब सरकार प्रकरणी दिलेल्या समान काम समान वेतन आदेशाची तात्काळ
अंमलबजावणी करणेत यावी. बाह्यस्रोत यंत्रणा (थर्ड पार्टी एजन्सीज) तात्काळ रद्द करून बाह्यस्रोत यंत्रणेद्वारे शासकीय विभागात कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचारी यांना तात्काळ शासनाचे आस्थापनेवर घेणेत यावे.
राज्य शासनाकडे १ लाख ७७ हजार पदे रिक्त आहेत. त्या रिक्त पदावर १ ते १५ वर्षापासून कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचे शासकीय सेवेत नियमित पदावर तात्काळ समायोजन करणेत यावे.
मुंबई येथे कार्याध्यक्ष एस एस जाधव, कोषाध्यक्ष विकास डेकाटे, सरचिटणीस शहाजी नलावडे, राज्य सचिव बाबासाहेब कोकाटे, सह कार्याध्यक्ष सचिन पाटील, महिलाध्यक्ष माधुरी थोरात, सह चिटणीस प्रशांत गायकवाड, राज्य उपाध्यक्ष इंजि. राजेंद्र बुराडे, विलास भोसले, अरुणा काकडे, ओंकार जाधव, मनोजकुमार मस्के, प्रमोद अहिरराव, १०२ वाहन चालक संघटनेचे हाजीमीया नसीर यांनी सर्व कर्मचारी यांना या धरणे आंदोलनात सहभागी होणेचे आवाहन केले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |