RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

लातूरला भूकंपाचा सौम्य धक्‍का

13 September 2018 at 19:38

वसमत : मागील अनेक महिन्यांपासून वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात भुगर्भातून आवाज येत असल्याचे प्रकार सुरू होते. आज, गुरूवार (दि. १३ सष्टेंबर) सकाळी नऊच्या सुमारास भुगर्भातून अचानक मोठे आवाज येत जमीन हादरल्याने या भागात भितीचे वातावरण पसरले आहे. लातूर येथे दोन रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाल्याची माहिती तहसील प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात मागील काही महिन्यांपासून जमिनीतून गुढ आवाज येऊ लागले होते. या आवाजामुळे या परिसरातील गावकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तर नागरिकांच्या म्हणण्यानुसार अचानक मोठा आवाज होवून काही वेळ जमीन हलत असल्याची काही दिवसांपासून म्हणणे होते. परंतु या गुढ आवाजाचे गुढ अद्यापही उकलले नाही. 

त्यातच मागील आठवडाभरात दोन वेळेस भूगर्भातून आवाज झाले. परंतु त्याची नोंद लातूर येथील भूकंप मापक केंद्रात नोंद झाली नव्हती. आज, गुरूवारी सकाळी ९ च्या सुमारास मोठा आवाज होऊन जमीन हलल्यासारखे जाणवले. याची नोंद लातूर येथील भूकंप मापक केंद्रात झाली असून २ रिश्टर स्केल एवढी भूकंपाची नोंद झाल्याचे तहसील प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. ऐन सणासुदीच्या काळात हा प्रकार घडल्याने या भागातील नागरीक भयभित झाले आहेत. पांगरा शिंदे सह कुपटी, वापटी, शिरळी,राजवाडी, आमदरी, राजदरी, सोनवाडी, जामगव्हाण, सोडेगाव, सालेगाव, असोला, बोल्डा, नांदापूर आदी परिसरातही सौम्य धक्‍का जाणवल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराची जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी गंभीर दखल घेतली असून आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून संबंधित गावामध्ये कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत.

 

राज्यातील आरटीओच्या ३७ अधिकार्‍यांचे निलंबन

राज्यातील 7 प्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आलेल्या तपासणीमध्ये नियमबाह्यपणे योग्यता प्रमाणपत्र जारी केल्याचे निष्पन्न झाल्याने 28 मोटर वाहन निरीक्षकांसह 9 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना आज गृहविभागाने निलंबित केले आहे.

23 hours before

विहिरीतून पाणी उपसल्यास मालकाकडून कर

'दुष्काळात तेरावा महिना' असं म्हणायची वेळ शेतकऱ्यांवर आता खरंच आली आहे. पावसाअभावी सुकत चाललेल्या पिकाला पाणी देण्यासाठी विहिरीतून पाण्याचा उपसा केल्यास विहीर मालकाला कर द्यावा लागणार आहे. राज्य सरकारने अध्यादेश काढून यासंदर्भात माहिती दिली आहे.

yesterday

डॉल्बीवर बंदीच, विसर्जन मिरवणुकीत डीजे नाही : हायकोर्ट

मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील बंदी कायम ठेवली आहे. हायकोर्टानं डॉल्बीला परवानगी देण्यास स्पष्ट नकार देत पाला संघटनेची याचिका फेटाळून लावली. ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यांवर कोर्टानं डीजेवरची बंदी कायम ठेवली.

yesterday

येत्या 24 तासात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं, राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

yesterday