सांगली : पश्चिम महाराष्ट्रात सतत सुरु असलेला मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे सांगलीत सध्या भीषण परिस्थिती आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्य़ांत आतापर्यंत १६ जणांचा बळी गेला आहे. पूरस्थितीमुळे बेघर झालेल्या दीड लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. दरम्यान सांगलीमध्ये पुरग्रस्तांना घेऊन जाणारी बोट पलटली असून ९ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगलीमधील पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ गावात ही घटना घडली आहे. मृतांमध्ये सात महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पुरानं थैमान घातलं असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. हे बचावकार्य सुरू असतानाच पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावात आज बोट उलटली. उलटलेल्या बोटीची क्षमता ३० ते ३२ जणांना वाहून नेण्याची होती. मात्र, पुरातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी त्यावर क्षमतेपेक्षा जास्त लोक चढले होते. त्यातून तोल जाऊन हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. बोटी उलटल्यानं एकच हल्लकल्लोळ उडाला. स्थानिक नागरिक बुडालेल्यांना वाचवण्यासाठी धावले. बचाव यंत्रणांच्या मदतीनं स्थानिकांनी काही जणांना बाहेर काढलं. काहींनी झाडांना पकडून व पोहून स्वत:चा जीव वाचवला. तर, इतरांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ९ मृतदेह हाती लागले आहेत. बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.
पलूस सांगली येथे उलटलेली बोट ही ग्रामपंचायतीची असून एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, शोधकार्य सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती एनडीआरएफनं दिली.
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |
स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल |
भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा, जावलीत भव्य भजन स्पर्धा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |