09:20pm | May 09, 2024 |
सातारा : सातारा स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी करत दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड करून तब्बल 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यातही त्यांना यश आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 मार्च रोजी अज्ञात चोरट्याने सातारा शहरातील एका घरात घरफोडी करून 9 लाख 29 हजार 500 रुपये किमतीचे 29 तोळे 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. त्याबाबतचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता.
त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या सूचनेप्रमाणे हा गुन्हा सराईत गुन्हेगार सुनील उर्फ सुशील बबन भोसले याने केल्याचे निष्पन्न करून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी 26 ग्रॅम सोन्याचे दागिने यापूर्वीच हस्तगत करण्यात आले होते. यानंतर या गुन्ह्यात आणखी एकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे आणि त्यांच्या तपास पथकाने ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी 1% लाख 50 हजार रुपये किमतीचे 25 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
दिनांक 25 ते 26 फेब्रुवारी दरम्यान गोटे, ता. कराड, जि. सातारा येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून 65 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. त्याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व तपास पथकाने हा गुन्हा सराईत गुन्हेगार राहुल हिरामण लष्करे रा. काळाखडक, वाकड, ता. मुळशी, जि. पुणे आणि अजय एकनाथ चव्हाण रा. गहूंजे ता. मुळशी जि. पुणे यांनी केल्याचे निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीतील व इतर तीन गुन्ह्यात चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी सात लाख रुपये किमतीचे दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून एकूण पाच घरफोडीचे गुन्हे उघड करून चालू बाजारभावाप्रमाणे 24 लाख 50 हजार रुपये किंमतीचे एकूण 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
नोव्हेंबर 2022 पासून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटरसायकल चोरी, इतर चोर्या असे एकूण 276 मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी 585 तोळे म्हणजेच 5 किलो 850 ग्रॅम असा एकूण 4 कोटी % लाख 40 हजार 900 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज साठे, सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, तानाजी माने, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, विश्वनाथ संकपाळ, आतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शेळके, विजय कांबळे, शरद बेबले, मंगेश महाडिक, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, सचिन साळुंखे, प्रवीण फडतरे, अमोल माने, अविनाश चव्हाण, अमित माने, मोहन नाचणं, अजित कर्णे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, हसन तडवी, मुनीर मुल्ला, सनी आवटे, गणेश कापरे, जयवंत खांडके, स्वप्नील कुंभार, शिवाजी भिसे, मनोज जाधव, राजू कांबळे, अरुण पाटील, अजय जाधव, अमित झेंडे, विक्रम पिसाळ, मोहन पवार, ओंकार यादव, प्रवीण कांबळे, रोहित निकम, स्वप्नील दौंड, विशाल पवार, सचिन ससाने, पृथ्वीराज जाधव, केतन शिंदे, धीरज महाडिक, मोहसीन मोमीन, वैभव सावंत, शिवाजी गुरव, पंकज बेसके, अमृत कर्पे, संभाजी साळुंखे, दलजीत जगदाळे, विजय निकम, दिपाली यादव, सौजन्या मोरे, अधिका वीर, शकुंतला सनस, अनुराधा सनस यांनी सहभाग घेतला.
फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पित्याविरोधात गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन |
वाहनासह साडेतेरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |