RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

महामार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक अखेर सुरू

12 August 2019 at 14:00

सात दिवसापासून किमान 35 ते 40 हजार वाहने पडली होती अडकून

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या भीषण महापुरामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. त्यामुळे जवळपास हजारो लहान मोठी वाहने महामार्गावर ठप्प झाली होती. आज (ता. 12) शिरोली फाट्यानजीक महापुराचे पुराचे पाणी ओसरल्याने अवजड वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो ट्रक बेंगळुरूसाठी रवाना झाले आहेत. 

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, आमदार अमल महाडिक, शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण भोसले आदींनी महामार्गाची पाहणी केली.

महामार्गावर आलेल्या पुरामुळे सातारा ते कर्नाटकातील तवंदी घाट या दरम्यान किमान 35 ते 40 हजार वाहने सात दिवसापासून अडकून पडली आहेत. त्यामध्ये परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस, खासगी, निमआराम, बस, टेम्पो, ट्रक चारचाकी वाहनांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

विशेषतः लक्झरी बस आणि सरकारी बसमधून प्रवास करणारे हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ तसेच हॉटेल व्यावसायिकांचे हात त्यांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. चहा, नाश्ता, आंघोळीसाठी लोक पुढे येऊन मदत करत आहेत. 

तत्पूर्वी, आज सकाळी सांगली फाटा ते तावडे हॉटेल दरम्यानचा महामार्ग जीवनावश्यक वस्तूंसाठी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. पेट्रोल, डिझेल, गॅस, सिलेंडर औषधे तसेच भाजीपाल्यांसाठी वाहतूक सुरू करण्यात आली. पाण्याची पातळी झपाट्याने ओसरू लागली आहे. आज सकाळी आठ वाजता पाण्याची पातळी दोन फुटांवर होती.

अजित पवारांवर गुन्हा दखल करा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (एमएससी बँक) कर्जांच्या वितरणात हजारो कोटी रुपयांचा घोटा‌ळा झाल्याप्रकरणी पाच दिवसांच्या आत एफआयआर नोंदवून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला

23 August 2019 at 14:38

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक 'खय्याम' काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे मुंबईतील सुजय रुग्णालयात निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

20 August 2019 at 02:35

एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात, 15 जणांचा मृत्यू, 35 जखमी

औरंगाबाद-शहादा एसटी बस अपघातातील मृतांचा आकडा 15 वर पोहोचला आहे, तर 35 जण जखमी आहेत. धुळे जिल्ह्यातील निमगुळ गावाजवळील सब स्टेशनजवळ रात्री हा अपघात झाला. कंटेनरची आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. यामध्ये एसटी बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर

19 August 2019 at 14:49

कावळ्यांची नाही तर मावळ्यांची चिंता करावी : शरद पवार

राष्ट्रवादीचे पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी रविवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीला उपस्थित राहून महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

19 August 2019 at 00:14