02:04am | Dec 18, 2019 |
पुणे : रंगभूमीचा नटसम्राट, चतुरस्त्र अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. लागू यांच्या निधनाने मराठी रंगभूमीवरील विचारी नट काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ रोजी सातारा येथे झाला होता. त्यांनी १९६९ मध्ये त्यांच्या नाट्य कारकिर्दीला सुरुवात केली होती. डॉ. लागू यांनी नाट्यक्षेत्र आणि सिनेक्षेत्रात त्यांच्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवला होता. रंगभूमीचं चालतंबोलतं विद्यापीठ अशी ओळख असणारे श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड निघून गेले आहेत.
‘सामना’, ‘सिंहासन’, ‘पिंजरा’ यासारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं. ‘नटसम्राट’ या नाटकातली त्यांची अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका विशेष गाजली. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील आठवड्यात तन्वीर सन्मान सोहळा झाला होता. त्याची सुरुवात श्रीराम लागू यांनीच केली होती. या कार्यक्रमाला डॉ. श्रीराम लागू हजर होते. हा त्यांचा शेवटचा कार्यक्रम ठरला. तन्वीर हा त्यांचा मुलगा होता त्याचं निधन झाल्यानंतर डॉ. लागू यांनी त्याच्या नावाने पुरस्कार सुरु केला होता.
अत्यंत अभ्यासू आणि विचारी नट अशी त्यांची ओळख होती. मराठी रंगभूमीवरचं नटसम्राट हे नाटक त्यांच्यासाठी लिहिलं गेलं होतं. त्यांनी जागतिक रंगभूमीची ओळख मराठी रंगभूमीला घडवली. घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर या नाटकांना जेव्हा विरोध होत होता, त्यावेळी त्यांनी खंबीर अशी भूमिका घेतली आणि तेअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहिले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |