कराड : कोळेवाडी ता. कराड येथे 95 हजाराच्या बनावट नोटा व पिस्तूल जप्त करत तीन संशयिताना अटक केली होती. या प्रकरणात आणखी दोघांचा सहभाग आढळून आला असून पोलिसांनी मंगळवारी नगर जिल्ह्यातील आरडगाव येथून दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता 23 नोव्हेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेने कोळेवाडी येथे तीन संशयितांना गेल्या आठवड्यात ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून 94 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा व गावठी पिस्टल हस्तगत केले. या प्रकरणाचा तपास करताना तालुका पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ यांनी स्वत: संशयितांकडे चौकशी करत त्यांची साखळी शोधण्याचा प्रयत्न केला. यामध्ये बाबासो गुलाब जाधव (वय 42) व रितेश बाबासो जाधव ( वय 23, दोघेही रा. आरडगाव, ता. राहुरी, जि. सातार) यांचा सहभाग आढळून आल्यावर त्यांना नगर जिल्ह्यातील आरडगाव येथून अटक करण्यात आली.
त्यांच्याकडून बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर व स्कॅनर असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 23 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील, पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक आपकर, पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, हवलदार सपकाळ, हवालदार अमोल पवार, आशिष पाटील यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी प्रयत्न केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |