06:52pm | Jul 13, 2021 |
फलटण : कसबा पेठ, फलटण येथील सिसनं. 2123 मधील राहते घर फलटण पालिकेतील नगरसेवक किशोरसिंह नाईक-निंबाळकर व त्याच्या पाच ते सहा सहकार्यांनी जेसीबी मशिनच्या सहाय्याने पाडून टाकल्यामुळे संपूर्ण घर जमिनदोस्त झाले आहे. भर पावसात सत्ताधारी नगरसेवकाने असे हीन कृत्य केल्यामुळे फलटण शहरामध्ये संतापाची वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अभिजीत प्रकाश महाजन यांनी यासंदर्भात फलटण शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मी वरील पत्यावर माझी पत्नी व मुले व कुटुंब असे कायमस्वरुपी राहत आहे. मी फलटण येथे वैभव शांतीलाल गांधी यांच्या मालकीच्या सिटी सर्व्हे नंबर 2923 कसबा पेठ मधील घरातील एका खोलीत भाडेकरु म्हणून सन 1967 सालापासून आमच्या कुटूंबासह राहत आहे. आजही आम्ही तेथे भाडेकरु म्हणून राहत आहोत. आजही मी या खोलीचे लाईट बिल भरीत आहे व घरभाडे मालकाला देत आहे. काल दिनांक 12 जुलै 2021 रोजी मी, माझी पत्नी व मुले माझ्या पत्नीचे वडील बेलवाडी, ता.इंदापुर, जि.पुणे येथे आजारी असल्याने त्यांना भेटावयास गेलो होतो. त्यामुळे मी माझ्या खोलीला कुलूप लावले होते आम्ही रात्री उशीर झालेने तेथेच मुक्काम केला. आम्ही आमच्या खोलीत नसल्याचा गैरफायदा घेवून रात्री घरमालक वैभव शांतीलाल गांधी, त्यांचा मुलगा विश्वराज वैभव गांधी, (दोघेही रा. शंकर मार्केट फलटण) ,नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व त्यांच्यासोबत पाच ते सहा अनोळखी इसम यांनी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मी भाडेकरु म्हणून राहत असलेली खोली जेसीबी मशीनने पाडुन टाकलेली आहे. त्यावेळी माझ्या खोलीत संसारोपयोगी भांडी, कंपडेलत्ता व सोळा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यामध्ये गंठण वजन दहा ग्रॅम व कानातील सोन्याचे सहा ग्रॅम असे दागिने होते. तसेच भारत गॅस कंपनीच्या सिलींडरच्या दोन भरलेल्या टाक्या व माझ्या पॅन्टच्या खिशातले सहा हजार तीनशे रुपये रोख होते. हे वरील सर्व सामान सदर इसमांनी खोली पाडताना चोरुन नेलेले आहे. मी आज दिनांक 13 जुलै 2021 रोजी बेलवाडी येथून सकाळी 7-00 वाजता सदर खोलीवर आल्यांनंतर झालेला प्रकारे मी पाहिला. त्यानंतर मी आसपासच्या लोकांकडे चौकशी केली असता त्यांनी मला सांगितले की, वर नमुद इसमांनी हे कृत्य रात्री एक वाजण्याच्या सुमारास केले आहे. त्यानंतर मी लगेचच घराचे मालक वैभव शांतीलाल गांधी व त्यांचा मुलगा विश्वराज गांधी यांच्याकडे गेलो. त्यावेळी मी त्यांना विचारले की, मी राहत असलेली खोली का पाडली ? त्यावर त्यांनी मला सांगितले की, आम्हीच पाडली, तुला काय करायचे ते कर. त्यावर मी त्यांना माझ्या मालकीचे वर नमुद चोरीला गेलेले सामान व दागिने व रक्कम मागितली. परंतु त्यांनी ती मला देण्यास नकार दिला व उलट मलाच दमदाटी देवून शिवीगाळ केली. या सर्व नमुद इसमांनी दिनांक 7 नोव्हेंबर 2020 रोजी असलेल्या खोलीमध्ये येवून मला दम दिला होता की, ही खोली जेसीबी मशीन लावून पाडणार आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता सगळे बाहेर जावा. त्यावेळी त्यांनी मला शिवीगाळ व मारहाणही केली होती. त्या संबंधातील तक्रार त्यावेळी फलटण शहर पोलिसांनी घेतली नसल्याने या घटनेची तक्रार मी दि. 16 नोव्हेंबर 2020 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे रजिस्टर पोस्टाने पाठवली होती. या तक्रारीची दखल घेवून तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी माझा तक्रारी अर्ज फलटण शहर पोलीस स्टेशनला पाठवला होता. यानंतर फलटण शहर पोलिसांनी कारवाई करुन संबंधितांना नोटीसही दिली होती. असे असूनसुद्धा त्यांनी माझी राहत असलेली खोली जेसीबीच्या सहाय्याने पाडून टाकलेली आहे. हे लोक गुन्हेगारी वृत्तीचे व कायदा हातात घेणारे आहेत.
तरी या सर्व लोकांपासून मला व माझ्या कुटूंबाच्या जिवीताला धोका आहे. तसेच या लोकांनी माझी खोली पाडून व खोलीतील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरुन नेहली असून माझे नुकसान केले आहे. म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महाजन यांनी केलेली आहे. दरम्यान, अशाप्रकारचा गंभीर गुन्हा घडूनही फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किंद्रे यांनी 24 तास उलटूनही यासंदर्भात संबंधितांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नव्हता.
पावसाळ्यात फुटपाथवरील झोपडी तोडण्यास मनाई
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पावसाळ्यात फुटपाथवरील झोपडी तोडण्यासही संबंधित यंत्रणांना मनाई आहे. असे असताना फलटणमधील सत्ताधारी नगरसेवकांनी गांधी कुटूंबियांची सुपारी घेवून महाजन यांचे घर अंधार्या रात्री तोडण्याचे धाडस केलेले आहे. त्यामुळे हा सुद्धा एकप्रकारे सर्वोच्च न्यायालयाचा अवमानच आहे. त्यामुळे फलटण शहर पोलिसांनी यासंदर्भात संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी फलटण शहरातील सूज्ञ नागरिकांनी केली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |