03:24pm | Jan 25, 2022 |
सातारा : शाहूपुरी परिसर हा सातारा शहर हद्दीत समाविष्ट झाला असला तरी,ज्या पद्धतीने नागरिकांच्या मूलभूत प्रश्नी लक्ष असायला पाहिजे त्या पध्दतीने आरोग्य व स्वच्छतेविषयी थोडे दुर्लक्ष झाल्याचे सध्याचे चित्र आहे. याप्रश्नी नगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्यावतीने सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
याप्रसंगी आघाडीचे भारत भोसले, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्रकुमार मोहिते, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, शोभा राजेंद्र केंडे, निलम विकास देशमुख,माधवी सुरेश शेटे, माजीउपसरपंच विकास देशमुख, सुरेश शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
निवेदन दिल्यानंतर मुख्याधिकारी बापट यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी भारत भोसले यांनी अनेक सोसायटी अंतर्गतचे गवत वाढलेले असून गटर्समध्ये घाण साचून गटर्स तुंबलेल्या अवस्थेत आहेत.बदलत्या नैसर्गिक हवामानामुळे आधीच घरोघरी नागरिक आजारी असल्याचे चित्र असतानाच या घाणीच्या साम्राज्यामुळे डासांचा प्रादुर्भावही वाढत आहे.या सर्व बाबींचा विचार करता शाहूपुरी वासियांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या सर्व प्रश्नी नगरपालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक लक्ष घालून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आवर्जून प्रयत्न करावेत अशी आग्रही मागणी केली. त्याचबरोबर सातारा शहरांप्रमाणेच शाहूपुरी भागातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणच्या दैनंदिन स्वच्छतेचेही नियोजन झाल्यास बऱ्यापैकी सार्वजनिक स्वच्छतेच्या प्रश्नावर योग्य तो तोडगा निघू शकतो त्यामुळे या मुद्द्यावरही नगरपालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी नगरपालिका प्रशासन नागरिकांच्या मूलभूत प्रश्नी नेहमीच सकारात्मक असून यापूढील काळातही नागरिकांची याबाबत होणारी हेळसांड थांबविण्यासाठी जरुर ते प्रयत्न प्रशासन करेल, अशी ग्वाही दिली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |