12:36pm | Apr 03, 2021 |
पुसेगाव: रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम बंद पाडून पुसेगावकरांना कोणी वेठीस धरु नये, अन्यथा ग्रामस्थांना सत्याग्रहाचा अवलंब करावा लागेल, असा इशारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.सुरेश जाधव यांनी दिला आहे.
सातारा-लातूर राज्यमार्गाचे पुसेगावमधून जाणार्या रस्त्याचे काम नुकतेच सुरु झाले होते. या रस्त्याचे रखडलेले काम सुरु होण्यासाठी पुसेगाव ग्रामपंचायत व सेवागिरी देवस्थान ट्रस्टतर्फे दि.11 मार्च रोजी आयोजित बैठकीत मेगा इंजिनीअरींगच्या प्रकल्प व्यवस्थापकांशी चर्चा झाली होती. पावसाळ्यातील चिखलाचा त्रास लक्षात घेता उन्हाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याची मागणी सेवागिरी देवस्ठान ट्रस्ट व पुसेगाव ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली होती. या बैठकीत या कामाला अडथळा ठरणारे सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेचे व्हॉव्ह तसेच झाडे ग्रामपंचायतीने दूर करुन द्यावेत अशी मागणी या अधिकार्यांनी केली होती. त्याप्रमाणे ग्रामपंचायतीने त्वरीत व्हॉल्व्ह बाजूला केल्यामुळे पुसेगावातून जाणार्या या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाला सुरुवातही झाली होती. परंतु आमदार महेश शिंदे यांनी कामाची पाहणी केली व झालेले काम निकृष्ट असल्याचे कारणपुढे करुन रस्त्याचे काम बंद पाडले. यानंतर क्वालिटी कंट्रोलच्या अधिकार्यांनीही झालेल्या कामांची पाहणी केली असून झालेले काम 99.9 टक्के दर्जेदार झाले असल्याचे नमुद केले आहे असे सागून डॉ.जाधव म्हणाले, गावातून जाणार्या या रस्त्याचे काम गेली चार वर्षे रखडलेले आहे. शिवाय सध्याचा गावातून जाणारा हा रस्ता अत्यंत खराब झाला असून त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्यावरुन कसरत करावी लागत आहे. शिवाय रस्त्यावरील दररोजच्या वाहतूकीमुळे ग्रामस्थ व व्यापारी वर्ग धुळीने त्रस्त झाला आहे. पुसेगाव येथे रींग रोडची आवश्यकता असताना त्यालाही अनेकांचा विरोध आहे. जर गावातून जाणार्या या रस्त्याचे कामच झाले नाही तर पुसेगावचा विकास तरी कसा होणार? असा प्रश्न करुन डॉ. जाधव म्हणाले, रस्त्याचे काम चांगले व वेळेत झाले नाही तर पुसेगावच्या नवीन वॉटरसप्लाय योजनेचे कामही रखडणार आहे.
सध्याच्या सदोष पाणी पुरवठा योजनेमुळे गावाला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही. नऊ मीटर रुंदीच्या या रस्त्याच्या दुतर्फा दीड मीटरची गटारे व त्याबाहेरील जागेत पाणीपुरवठा करणार्या जलवाहिन्या बसवण्यात येणार आहेत. परंतु रस्त्याचे काम बंद पडल्यामुळे ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. वास्तविक लोकप्रतिनीधींनी विकास कामे सुरु होण्यासाठी प्रयत्न करावयाचे असतात पण सुरु असलेले काम बंद पाडून लोकप्रतिनीधी पुसेगाव ग्रामस्थांना वेठीस धरत आहेत. रस्त्याच्या सुरु असलेल्या कामात काय सुधारणा आवश्यक आहेत ते सांगून लोकप्रतिनीधींनी काम पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याने अनेक ग्रामस्थांनी आपल्या नवीन घराचे बांधकाम थांबविलेले आहे. थांबलेले काम सुरु होण्यासाठी प्रसंगी काँग्रेसपक्षातर्फे सत्याग्रह करण्यात येईल. तसेच या कामाबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच खासदार श्रीनिवास पाटील, बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना जिल्हा काँग्रेस समितीतर्फे निवेदन देण्यात येणार असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.नऊ मीटर रुंदीच्या या रस्त्याच्या दुतर्फा दीड मीटरची गटारे व त्याबाहेरील जागेत पाणीपुरवठा करणार्या जलवाहिन्या बसवण्यात येणार आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |