06:55pm | May 27, 2023 |
सातारा : कोरेगाव पंचायत समिती कार्यालयासमोर असलेल्या कोरेगाव हॅस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड या रुग्णालयात गेली चार वर्षे व्यवस्थापक म्हणून काम करणार्या शशिकांत चंद्रकांत बोतालजी यांच्या आत्महत्येप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात दोघा डॉक्टरसह एका व्यावसायिकाविरोधात ऍट्रॉसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोरेगाव पंचायत समिती कार्यालयासमोर असलेल्या कोरेगाव हॅस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड या रुग्णालयात गेली चार वर्षे व्यवस्थापक म्हणून काम करणार्या शशिकांत चंद्रकांत बोतालजी (वय 32 रा. चिंतामणी नगर, कोरेगाव) यांना 14 लाख रुपयांची अफरातफर केली असून, आमची रक्कम परत कर, असे म्हणत कुटुंबियांच्या मालकीची जमीन साठेखत करारनामा करून घेत जातिवाचक शिवीगाळ करत मानसिक व शारीरिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी डॉ. सुहास चव्हाण, डॉ. गणेश होळ या दोन डॉक्टरांसह गोपाळ साळुंखे या एका व्यावसायिकाविरोधात कोरेगाव गुन्हा दाखल होताच मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. शशिकांत बोतालजी यांच्या आत्महत्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल होताच मृतदेह असलेली रुग्णवाहिका बोतालजी कुटुंबीय व नातेवाईकांनी आपल्या निवासस्थानी नेली. समाजबांधव व विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे देखील अंत्यविधीसाठी रवाना झाले. सुमारे तासभर कार्यकर्ते जमले असल्याने परिसरात तणाव होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार व त्यांच्या सहकायांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले होते.
पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केले आणि ऍट्रॉसिटी कायद्याखाली शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी चंद्रकांत किसन बोतालजी यांनी फिर्याद दिली आहे.
शशिकांत बोतालजी हे चार वर्षे कोरेगाव हॉस्पिटल येथे व्यवस्थापक म्हणून काम करत होते. रुग्णालयाचा आर्थिक व्यवहार ते पाहत होते. राज्य आणि केंद्र सरकारचा कर चुकविण्यासाठी बोतालजी यांच्या व्यक्तिगत बँक खात्यावरून आर्थिक व्यवहार केले होते. या व्यवहारामध्ये 14 लाख रुपयांची अफरातफर झाल्याचा संशय व्यक्त करत डॉ. सुहास चव्हाण, डॉ. गणेश होळ व गोपाळ साळुंखे हे गेले वर्षभर सातत्याने बोतालजी यांना त्रास देत होते. सातत्याने जातीवाचक शिवीगाळ करून 14 लाख रुपये परत देण्याची मागणी करत होते. त्यासाठी त्यांना मारहाण देखील करण्यात आली.
या त्रासाला कंटाळून बोतालजी कुटुंबियांनी आपल्या मालकीची जमीन नोटरी व्यवहाराद्वारे साठेखत करून दिली होती. तुमची जमीन आठ लाख रुपयांची असून उर्वरित सहा लाख रुपये द्या, असा तगादा लावत मानसिक त्रास देत होते. त्रास सहन झाल्याने अखेरीस गुरुवारी सकाळी शशिकांत बोतालजी यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उशीखाली स्वाक्षरीसह चिठ्ठी ठेवली असून त्यामध्ये सर्व प्रकार नमूद केला आहे. बोतालजी कुटुंबियातील सदस्यांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना प्रकृती खालवत चालली होती.
त्यानंतर सातारच्या जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. रात्री दोन वाजता बोतालजी यांचा मृत्यू झाला. तेथेच शवविछेदन करण्यात आले.
याप्रकरणी दोषी असलेल्या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी दिवसभर कुटुंबातील सदस्यांसह समाज बांधव पोलीस ठाण्याच्या आवारात उपस्थित होते. विविध दलित संघटनांच्या पदाधिकायांनी कोरेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. रात्र झाली तरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत नसल्याने शशिकांत बोतालजी यांचा मृतदेह घेऊन थेट रुग्णवाहिका पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आली. यावेळी महिला देखील उपस्थित होत्या. वातावरण तणावपूर्ण बनले होते.
दरम्यानच्या काळात चंद्रकांत किसन बोतालजी यांची फिर्याद घेतली जात होती. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, शशिकांत चंद्रकांत बोतालजी हे गेले अनेक दिवसांपासून तणावाखाली होते. डॉ. सुहास चव्हाण, डॉ. गणेश होळ व गोपाळ साळुंखे यांच्या जातीवाचक शिवीगाळीला आणि मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदेशीर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |