पुसेगाव : मनुष्यबळ लोकविकास अकादमी मुंबई यांचेमार्फत राज्यातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या लोकांना सन्मानित करण्यात येते. दि. 5 सप्टेंबर 2020 रोजी शिक्षकदिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आले होते. परंतु कोविड-19 महामारीमुळे जागतिक शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात दि. 4ऑक्टोबर 2020 रोजी ‘राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन 2020’ या ऑनलाईन कार्यक्रमात अकादमीचे अध्यक्ष कृष्णाजी जगदाळे यांचे हस्ते ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार 2020’ ने श्री.धायगुडे यांना सन्मानित करण्यात आले.
सातारा जिल्ह्यात ‘स्वच्छ-सुंदर उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शाळा’ असा लौकिक असलेल्या विसापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विसापूर येथे गेली 8 वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. आपल्या सहकार्यांच्या व ग्रामस्थांच्या मदतीने अल्पावधीतच त्यांनी विसापूर शाळेचा कायापालट केला आहे. ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल 15 लक्ष रुपयांच्या शैक्षणिक उठावातून त्यांनी शाळेमध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या आहेत. प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही, डिजिटल क्लासरूममध्ये अत्याधुनिक स्मार्ट बोर्ड, 1 ली च्या संपूर्ण वर्गासाठी टॅब, सुसज्ज संगणक कक्ष, साधा व कलर प्रिंटर या तंत्रस्नेही साधनांबरोबरच प्रयोगशाळा व वाचनालय, प्युरीफायर, आकर्षक बोलकी शाळा, सुसज्ज सभागृह, आकर्षक वर्गासजावट, शालेय परसबाग, शालेय मैदान, आधुनिक स्वच्छतागृह ही कामे पूर्णत्वास नेली.
भौतिक साधनांबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर त्यांचा विशेष भर असतो. शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी ज्यादा वेळ देऊन कामकाज केले जाते. विविध स्पर्धा परीक्षेत अनेक विद्यार्थी राज्यस्तरावर चमकले आहेत. यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्व विकास स्पर्धा व बालक्रीडा स्पर्धा यांमध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले श्री.धायगुडे, सहकारी शिक्षक आणि विसापूर ग्रामस्थ यांचे प्रयत्नामुळे शाळेला आय.एस.ओ. मानांकन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.स्वच्छ-सुंदर उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शाळा स्पर्धेतही शाळेला जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचे तीस हजार रुपयांचे पारितोषिक व सन्मानपत्र मिळाले. सदर पुरस्काराचे श्रेय विद्यार्थी आणि विसापूर ग्रामस्थ यांचे आहे, असे मत श्री.धायगुडे यांनी व्यक्त केले.
‘विद्यार्थीहीत डोळ्यासमोर ठेऊन अखंड व चौफेर कार्य करणार्या श्री.धायगुडे गुरुजींचे कार्य समस्त शिक्षक बांधवांसाठी प्रेरणादायी आहे,’असे मत जि.प.उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी त्यांचे अभिनंदन करताना व्यक्त केले. विसापूरचे माजी सरपंच सागरभाऊ साळुंखे, खटाव पं.स.चे माजी उपसभापती संतोष साळुंखे, सरपंच शहाजी साळुंखे, रामभाऊ सावंत, चेअरमन राजेंद्र साळुंखे, उपसरपंच मुरलीधर साळुंखे, शोभाताई शिंदे, सुरेखा जरग, जयश्री साळुंखे, पोलीस पाटील, प्रल्हाद सावंत, विसापूर ग्रामस्थ तसेच गटशिक्षणाधिकारी भराडे मॅडम, विस्ताराधिकारी लक्ष्मण पिसे, केंद्रप्रमुख सौ.चव्हाण मॅडम, प्रमोद जगदाळे, मुख्याध्यापक गंगाराम भुलूगडे, शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष महेंद्र अवघड, शिक्षक नेते सुनील सावंत, संचालक बंडोबा शिंदे, संघाचे अध्यक्ष सूर्यकांत कदम, शिक्षक नेते अंकुश शिंदे, अर्जुन जाधव, जाखणगाव केंद्रातील सर्व शिक्षकमित्र यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |