02:23pm | Dec 30, 2021 |
पाटण : रवले-सुतारवाडी, ता. पाटण येथे सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची संतापजनक घटना घडली आहेत. याप्रकरणी पाटण पोलिसांनी नराधम आरोपींला ताब्यात घेतले असून या घटनेने पाटणसह सातारा जिल्हा आणि राज्यभरात खळबळ उडाली आहे.
संतोष थोरात असे पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान, या घटनेने रवले- सुतारवाडीसह ढेबेवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पाटण तालुक्यातील रवले-सुतारवाडी येथील पीडित मृत अल्पवयीन मुलगी बुधवारी 29 रोजी सायंकाळी बेपत्ता झाली होती. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत संबंधित मुलीच्या कुटुंबीय, नातेवाईकांनी शोध घेतला. परंतु, ती मिळून आली नाही. गुरुवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास रवले- सुतारवाडी येथे घटनेतील पीडित मृत मुलीच्या घरापासून सुमारे 500 मीटर अंतरावर ओढ्यात तिचा मृतदेह आढळून आला.
याबाबतची माहिती मिळताच ढेबेवाडी, पाटण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच गुरुवारी 30 रोजी सकाळी जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे किशोर धुमाळ, कराड उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपी संतोष थोरात याला पाटण पोलिसांनी ताब्यात घेतले असून परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. या घटनेने ढेबेवाडी परिसरासह पाटण, सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |
स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल |
भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा, जावलीत भव्य भजन स्पर्धा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |