06:19pm | Mar 15, 2022 |
कराड : बहुजन सामाजिक विकास संस्थेच्या वतीने बुधवार, दि. 16 रोजी उपेक्षितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी कराड तहसील कार्यालयावर भव्य शिमगा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष माने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊनही अनेकांना मूलभूत अधिकारांपासून वंचित राहावे लागले आहे. उपेक्षित, भूमिहीन, शेतमजूर, बांधकाम कामगार व बँजो, छोट्या कलावंतांना निवारा, वृद्धापकाळात पेन्शन, मालकीची जागा देऊन पुनर्वसन केले नाही. 75 वर्ष सतत त्यांच्यावर अन्याय होत असून आत्तापर्यंतच्या सर्व शासनाने त्यांना मूलभूत हक्क देण्यातपासून वंचित ठेवले आहे.
त्यामुळे या परिस्थितीत बदल घडवण्यासाठी, तसेच आपल्या न्याय व हक्कासाठी आणि अन्यायाविरोधात घाव घालून सरकारला जाब विचारण्यासाठी भव्य शिमगा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दि. 16 रोजी दुपारी 1 वाजता कराड येथील भेदा चौकातून या मोर्चाला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार असून आपल्या विविध मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन संतोष माने यांनी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |