कराड : राज्याचे सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सह्याद्रि सहकारी साखर कारखाना पुरस्कृत भाग्यलक्ष्मी सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या. अरेवाडी, गमेवाडी, डळेवाडीच्या चेअरमनपदी प्रा. अशोक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सहकारी संस्थांचे उपनिबंधक तथा अध्यासी अधिकारी व्ही. आर. थत्ते होते.
संस्थेचे संस्थापक चेअरमन माजी सरपंच स्व. गोविंदराव चव्हाण यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर प्रा. अशोक चव्हाण यांची निवड झाली आहे. प्रा. चव्हाण कराड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष असून कराडच्या महिला महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. श्री कालिकादेवी सहकारी पतसंस्था, शिवाजी क्रीडा मंडळ, भैरवनाथ क्रीडा मंडळ, सातारा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशन अशा विविध संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत.
या निवडीनंतर अभिनंदन करताना ना. बाळासाहेब पाटील म्हणाले, गोविंदराव चव्हाण यांनी भाग्यलक्ष्मी सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या स्थापनेपासून सलग 36 वर्षे चेअरमनपद भूषविले. 1986 साली स्थापन झालेली संस्था 1991 साली सुरु झाली. व ज्येष्ठ नेते स्व.पी.डी. पाटीलसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2002 मध्ये कर्जमुक्त झाली.
ते पूढे म्हणाले, 1 हजार 460 एकर कार्यक्षेत्र असणाऱ्या या संस्थेच्या कार्यक्षेत्रातील 1 हजार 260 एकर शेतीला या संस्थेची पाणी पुरवठा करण्याची क्षमता आहे. पैकी 785 एकर शेतीला संस्था सुयोग्य पद्धतीने पाणी पुरवठा करते. आज सर्व पाणी पुरवठा संस्थां आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर वीजबिल हा काळजी करणारा मुद्दा आहे. शासन हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असते. प्रा. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही पाणी पुरवठा संस्था लवकरच स्वावलंबी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी सह्याद्रि साखर कारखान्याचे संपर्क अधिकारी आर.जी. तांबे, इरिगेशन इंजिनिअर संजय क्षीरसागर, संस्थेचे व्हाईस चेअरमन पांडुरंग माने, संचालक विठ्ठलराव जाधव, आनंदराव देसाई, शिवाजीराव जाधव, रामचंद्र जाधव, बबनराव बाबर, वसंतराव बाबर, जगन्नाथ खडंग, सचिव आनंदराव जाधव उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |