सातारा : दोन दुचाकी व एक चारचाकी अल्टो कार याचा तिहेरी अपघात होवून युवकाचा मृत्यू झाला. केतन यशवंत लेंभे, रा. पिंपोडे बुद्रुक ता. कोरेगाव असे त्याचे नाव आहे. ही घटना शनिवार,दि. २0 रोजी सायंकाळी ६ वा. आरळे ता. सातारा गावच्या हद्दीत घडली. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.
याबाबत घटनास्थळावरुन व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथील केतन यशवंत लेंभे वय २५ आणि जय उत्तम भोईटे वय २२ रा. आदर्की बुद्रुक ता. फलटण हे दोघेही शनिवारी सकाळी आपल्या व्यक्तीगत कामानिमित्त सातारा येथे आले होते. त्यानंतर ते पिंपोडे बुद्रुक येथील गावी दुचाकी क्र. एमएच ११ सीझेड ५५८१ वरुन जात होते. दरम्यान, आरळे येथील अभिषेक नर्सरीनजिक येताच फलटण येथून सातारा शहराकडे येणाऱ्या चारचाकी अल्टो कारने वेगात येत दुचाकीला कट मारला असे दुचाकीवरील जय भोईटे यांनी सांगितले. ही चारचाकी क्षणात निघून गेल्याने नंबर समजला नाही. याचवेळी दुचाकीवरील वेग नियंत्रण करताना रस्त्यावरील खड्डे चुकवताना समोर जाणाऱ्या दुचाकीवर ही गाडी धडकली. यामध्ये दोघेही जण गंभीररित्या जखमी झाले. यानंतर तत्काळ सिव्हील हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचारानंतर खासगी रुग्णालयात दोघांनाही दाखल करण्यात आले. त्यानंतर रविवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या दरम्यान केतन यशवंत लेंभे याचे निधन झाले. तर जय भोईटे याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती सुधारत आहे.
केतन यशवंत लेंभे हा अभियांत्रिकी विद्यालयातून पदवी पूर्ण करुन पुणे येथील एका खासगी कंपनीत कामाला होता. गावी आल्यानंतर ही घटना घडली. केतनच्या पश्चात आई, बहीण असा परिवार आहे. केतन याचे वडील यशवंत यांचे वीस वर्षापूर्वी निधन झाले होते. एकुलता एक असणाऱ्या केतनच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतचा अधिक तपास पो.उप. निरीक्षक जाधव या करत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |