03:28pm | Sep 19, 2020 |
सातारा: जिल्हा रुग्णालयातील नवीन पोलीस ठाण्याचे घोंगडे अद्याप भिजतच पडले आहे. पोलीस ठाण्याचे बहुतांश काम पूर्ण झाले असून उर्वरित कामाला रुग्णालयाच्या प्रशासनाने कोलदांडा घातला असल्यामुळे त्या ठिकाणी काम करणाऱ्या पोलिसांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कोरोना योद्धा म्हणून पोलिसांचे आणखी किती बळी हवे आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
मार्च २०२० च्या शेवटच्या आठवड्यात सातारा जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला. त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे येथील जिल्हा रुग्णालयातील विविध वॉर्डमध्ये कोरोना अनुमानित आणि बाथित व्यक्तींना दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. बाधित व्यक्तींची संख्या अत्यल्प असल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणताही धोका नव्हता. मात्र एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये कोरोनाबाधित व्यक्तींच्या संख्येत वाढ होऊ लागल्यामुळे जिल्हा रुग्णालयात असणाऱ्या पोलीस ठाण्याच्या जवळचा वार्ड कोरोनाबाधित व्यक्तींसाठी आरक्षित करण्यात आला. मुळात पोलिस ठाण्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जाब जबाब घेण्यासाठी नेहमी रुग्णालयाच्या विविध वार्डमध्ये जावे लागते. कोरूना हा संपर्कात आल्यामुळे होत असल्यामुळे त्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. दरम्यानच्या काळात कोरोनामुळे काही पोलीस अधिकारी बाधित आढळून आले होते. तर काही कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या पोलिसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एवढेच नव्हे तर जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत काम करतात या एकाच कारणावरून एका पोलीस कर्मचाऱ्याला तो राहतो त्या परिसरातील नागरिकांनी त्यांच्या कुटुंबियांना वाळीत टाकण्याचा प्रयत्नही झाला होता.
तथापि एप्रिल २०२० महिन्यामध्ये कोरोनाव्यक्तींच्या नजीक असणाऱ्या पोलीस ठाण्याचे स्थलांतर जिल्हा रुग्णालयातील अन्य ठिकाणी करण्याचे नियोजन करण्यात आले. प्रत्यक्ष कामाला प्रारंभही झाला. मात्र २० ते २५ दिवस काम केल्यानंतर हळूहळू त्या कामात संथगती येऊ लागली. नंतर तर ते काम अर्धवट ठेवण्यात आले. गेल्या महिनाभरात सातारा शहर व जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात सर्व वार्डमध्ये कोरोनाबाधित व्यक्तींवर उपचार सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. दुसरीकडे जिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी बेडच शिल्लक नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, नर्सेस यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना किमान पीपीई किटची सुविधा उपलब्ध होते. मात्र अशा प्रकारच्या सुविधा जिल्हा ररूग्णालयाच्या पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या पोलीस कर्मचार्यांना मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी कोरोना योद्धा म्हणून खूप चांगली भूमिका बजावली आहे. मात्र अशा कोरोनायोद्धा असणाऱ्या पोलिसांच्या प्रकृतीची हेळसांड होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोरोना योद्धा म्हणून आणखी बळी द्यायचे नसतील तर सातारा जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाने तात्काळ हाती घेतलेल्या नवीन पोलीस ठाण्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी या निमित्ताने होत आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |