02:15pm | Nov 25, 2020 |
कराड: युवकांनी नोकरीच्या मागे धावू नये. विविध कौशल्य आत्मसाद करून घेण्यावर भर देवून आत्मसाद केलेल्या कौशल्याच्या जोरावर स्वत:चा व्यवसाय करावा, असे प्रतिपादन प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे प्रादेशिक कार्यकारी अधिकारी अनिकेत मोरे यांनी केले. विद्यानगर, कराड येथील कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
स्वातंत्र्यसैनिक रघुनाथ मोरे युवा प्रतिष्ठान मानेगाव संचलित प्रधानमंत्री कौशल विकास केंद्र, विद्यानगर- कराड येथे उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे प्रादेशिक कार्यकारी अधिकारी अनिकेत मोरे होते. सोशल डिस्टंट पाळून व मास्क वापरून कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे संभाजीराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सहकार महर्षी स्व. जयवंतराव भोसले आप्पा आणि स्वातंत्र्यसैनिक स्व. रघुनाथ मोरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढवून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
पुढे बोलताना श्री. मोरे म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशातील शेतकर्याच्या मुलाने आधुनिक शेतीचे मोफत कौशल्य शिकावं यासाठी या कोर्सची सेंद्रीय शेती या विषयाच्या बॅचचे शासनाच्या माध्यमातून कराडमधील विद्यानगर येथे सुरुवात करण्यात आली आहे. कौशल्य घेणार्या विद्यार्थ्यांसाठी मोफत टी-शर्ट, दोन लाखांचा अपघाती विमा, पुस्तिका, वही-पेन आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे असेही मोरे म्हणाले.
त्यावेळी आनंदा माने (काका), स्वरूपा डेअरीचे सीईओ विनायक बाबर, विजय मोरे, राजेश जाधव, ट्रेनर अमृता तोडकर, समन्वयक अजिंक्य जाधव, ऋषिकेश गोळे आणि प्रशिक्षणार्थी सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन ऋषिकेश गोळे यांनी केले. स्वागत अमृता तोडकर यांनी केले आणि आभार विनायक बाबर यांनी मानले.
पिकअप- दुचाकी धडकेत दोघे जखमी |
त्रिमली येथून गॅस सिलेंडर लंपास |
जिहे नजिक अपघातात एक जखमी |
ट्रकमधून 18 लाख रुपयांची वेलची लंपास |
बेदरकारपणे कार चालविणार्या एकावर गुन्हा |
सातारा येथे चेन स्नॅचिंगप्रकरणी दोघांवर गुन्हे |
विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार |
सातार्यात जुगार अड्ड्यावर छापा |
जिल्ह्यात दारु अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यात तिघांची गळफास घेवून आत्महत्या |
बांधकाम भवन बाहेर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला |
पिसाळलेला कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू |
अंबेदरे येथे मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हे |
नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती साजरी |
जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा येथे चेन स्नॅचिंगप्रकरणी दोघांवर गुन्हे |
विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार |
सातार्यात जुगार अड्ड्यावर छापा |
जिल्ह्यात दारु अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यात तिघांची गळफास घेवून आत्महत्या |
बांधकाम भवन बाहेर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला |
पिसाळलेला कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू |
अंबेदरे येथे मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हे |
नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती साजरी |
जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
उस उत्पादकांना सर्वाधिक नफा मिळण्यासाठी शेती अधिकार्यांनी तत्पर रहावे : ना. बाळासाहेब पाटील |
68 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
डंपरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू |
'जनकल्याण' व 'तीर्थक्षेत्र' आघाड्यांच्या राजकीय आखाड्यात, विषय समित्यांच्या निवडी प्रशासनाच्या कचाट्यात |
जीएसटी भवन कार्यालयाचे उद्घाटन |