03:59pm | Apr 22, 2021 |
पुसेगाव: पुसेगाव येथे गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुसेगाव ग्रामस्तरीय सुरक्षा समितीने कडक उपायोजना म्हणून कोरोनाला अटकाव करता यावा, यासाठी सर्व व्यापारी व नागरिकांच्या माध्यमातून स्वयंम्स्फूर्तीने सहा दिवसाचा जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज दुसर्या दिवशीही सर्व बाजारपेठ बंद होती. दरम्यान पुसेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात औषध फवारणी करण्यात आली.
पुसेगाव हे महत्वाचे बाजारपेठेचे ठिकाण आहे. सुमारे 20 पेक्षाही अधिक गावातील लोक खरेदी व अन्य व्यवहारासाठी येतात. गेल्या काही दिवसांमध्ये पुसेगाव परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचे गांभीर्य ओळखून या साखळी ला वेळीच पायबंद घालण्यासाठी सोमवारी प्रशासनामार्फत पुसेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक चेतन मछले, महसूल प्रशासनाचे तलाठी गणेश बोबडे, सरपंच विजय मसणे, उपसरपंच पृथ्वीराज जाधव, ग्रामस्तरीय समितीने एकत्र येऊन पुसेगाव स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेतला. व्यापारी व नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
दरम्यान पुसेगाव येथील कोविंड सेंटरमध्ये आज आखेर 72 ऍक्टिव्ह रुग्ण तर पुसेगावमध्ये आजअखेर रुग्णांचा आकडा 55 वर गेलेला आहे. जनता कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यापार्यांनी नियमांचे पालन केल्याचे दिसून आले. तसेच ग्रामस्तरीय सुरक्षा समितीने घेतलेल्या नियमांचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई व दंड करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
दरम्यान 6500 हजार लिटर औषध फवारणी ट्रॅक्टर मिशनद्वारे संपूर्ण गावात पुसेगाव ग्रामपंचायती मार्फत करण्यात आली. यामध्ये दोन हनुमानगिरी हायस्कुल, सेवागिरी महाविद्यालय, दोन ज्युनिअर कॉलेज, तीन मराठी जि.प.शाळा, भवानी नगर, शिक्षक कालनी, पब्लिक स्कुल, डॉ.कदम कालनी, विठ्ठलनगर, घाडगे कालनी, भंडारी चेबर्स कॉलनी, आण्णा उडप्पी हॉटेल कॉलनी, शंकरपार्वती मंगल कार्यालय कॉलनी, इनाम आंबा कालनी, डॉ.भुजबळ कॉलनी, फलटण रोड, वडुज रोड, नंदीवाले समाज कॉलनी, सेवागिरी विद्यालय कॉलनी, डॉ.काटकर कालनी, स्टेट बक कालनी, गोलघर कालनी, माळावरील नांगरे कॉलनी, जुनेपोस्ट, जामदारवाडा, क्षीरसागर आळी, हवेली, पडकेवाडा, बाजारपटांग, पोलिस स्टेशन, ब्राम्हणआळी, मानेआळी, दनेताजी चौक, जयमहाराष्ट्र मंडळ आळी, स्मशानभुमी, मारुती मंदीर लेंडोरी आळी बेघर, फलटण रोड बेघर, गोरे वस्ती, डोंगरवस्ती कुंभारआळी वगैरे ठिकाणी औषध फवारणी करुन स्वच्छता करण्यात आली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |