कराड : कर्ज मिळवून देतो, या अमिषाने कराडमधील औषध दुकान मालकाची सुमारे साडेसात लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अहमदाबाद येथील ट्रान्सओशन डायमंड ग्रुपने ही फसवणूक केल्याची तक्रार सतीश जगदीशप्रकाश गुप्ता यांनी शहर पोलिसांत दिली आहे. त्यानुसार कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सतिश जगदीशप्रकाश गुप्ता (वय 46, रा. शिवाजी हौसिंग सोसायटी, कराड) हे औषधाच्या दुकानाचे मालक आहेत. मागील वर्षीच्या 15 ऑक्टोबर रोजी गुप्ता यांना त्यांच्या मोबाईलवर कर्जाच्या ऑफरचा मेसेज आला. त्यानुसर त्यांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता मिनल शर्मा नावाच्या महिलेने आपण अहमदाबाद येथील ट्रान्सओशन डायमंड ग्रुपमधून बोलत आहे. आपणास किती कर्जाची आवश्यकता आहे असे विचारल्यानंतर गुप्ता यांनी 15 लाख रुपये कर्ज पाहिजेअसल्याचे सांगितले. त्यावर गुप्ता यांना 20 लाख रुपये लोन 9 टक्के व्याजदाराने मंजूर होईल असे सांगण्यात आले. त्यानंतर गुप्ता यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड, सहा महिन्याचे बँक स्टेंटमेंट, व एक कॅन्सल चेकची मागणी करण्यात आली. त्या मागणीवरून गुप्ता यांनी ही कागदपत्रे गु्रपच्या व्हॉटस्ऍपवर पाठवली. त्यानंतर ग्रुपने कर्जप्रकरण मंजूर झाल्याचा मेल गुप्ता यांच्या मेल आयडीवर पाठवला. त्यानंतर ट्रान्सओशन डायमंड ग्रुपने गुप्ता यांच्याकडून कर्जाच्या नावाखाली 15 ऑक्टोबर 2019 ते 07 एप्रिल 2020 पर्यंत वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये वेळोवेळी 7 लाख 62 हजार 258 रुपये भरून घेतले. पैसे भरल्यानंतरही कर्ज मिळत नसल्याने आपली फसवणुक झाल्याचे गुप्ता यांच्या लक्षात आले. यामुळे गुप्ता यांनी आपले कर्ज घ्यायचा बेत रद्द करून माझे भरलेले पैसे परत करा, अशी मागणी केली. मात्र ग्रुपकडून अपेक्षित असा प्रतिसाद न मिळाल्याने गुप्ता यांना आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अहमदाबाद येथील ट्रान्सओशन डायमंड ग्रुपविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर करीत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |