01:03pm | Dec 16, 2020 |
बुध: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी वडुज अंतर्गत पाचवड (ता.माण) येथील बाह्यस्त्रोत कर्मचारी प्रदिप खरात शॉक लागून मृत्युमुखी पडला. त्यास जबाबदार असणारे महावितरणचे अधिकारी व ठेकेदार चरेगावकर यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपाई (आठवले) ने कार्यकारी अभियंता यांचाकडे केली आहे.
कार्यकारी अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये काम करत असलेल्या बाह्यस्त्रोत यांच्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. सदस्य बाह्यस्रोत कर्मचारी हे त्यांची पात्रता नसताना काम करत आहेत व त्यापोटी ते सदर ठेकेदारास आर्थिक व्यवहार करत आहेत. आपल्या स्तरावर चौकशी करून पात्रता नसणार्या कर्मचार्यांना कमी करावे व सदर ठिकाणी पात्रता असणारे कर्मचारी भरावेत.
देवळी (ता.माण) अंतर्गत पाचवड येथे प्रदीप जगन्नाथ खरात नावाच्या बाह्यस्त्रोत कर्मचारी शॉक लागून मृत्युमुखी पडला. त्या कर्मचार्याची शैक्षणिक पात्रता नसतानाही तो काम करत होता. त्याची सविस्तर चौकशी करून खरात कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी व त्यास कर्मचारी पात्रता नसतानाही संबंधित ठेकेदार तसेच महावितरणचे वरिष्ठ अधिकारी यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी.
संबंधित ठेकेदार चरेगावकर याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच या प्रकरणाची चौकशी न झाल्यास होणार्या परिणामांना आपले कार्यालय सर्वस्वी जबाबदार राहील, असाही इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी खटाव तालुका कार्याध्यक्ष गणेश भोसले, तालुका नेते संदीप काळे, अक्षय घाडगे, सचिन वाघमारे आदींसह रिपाईचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पाण्यात बुडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू |
सातार्यातून युवक बेपत्ता |
निकालावर समाधानी नाही; सरकार पक्षाने अपिलात जावे |
सातारा येथे गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन सोहळा |
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला |
गावदेव मिरवणुकीत जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत धुमश्चक्री |
साताऱ्यात पाणीपुरवठ्याचा व्हॉल्व्हला गळती |
सिव्हील हॉस्पिटलच्या पार्कींगमधून दुचाकीची चोरी |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |

स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल |
भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा, जावलीत भव्य भजन स्पर्धा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |