सातारा : साताऱ्यातील गुरुवार पेठेत असलेल्या गुरुवार टाकीच्या व्हॉल्व्हला गुरुवारी सकाळी गळती लागली. पाणीपुरवठ्याच्या वेळेतच हा प्रकार घडल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. पालिकेकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असले तरी ऐन उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला.
साडेपाच लाख लिटर साठवण क्षमता असलेल्या गुरुवार टाकीतून पहाटे पाच ते सकाळी सहा व सकाळी सहा ते सात अशा दोन सत्रात पाणीपुरवठा केला जातो. गुरुवारी पहिल्या सत्रात पालिका कार्यालय ते गुरुवार टाकी या भागाला पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास अचानक टाकीजवळ असलेल्या व्हॉल्व्हची प्लेट निसटली अन् व्हॉल्व्हला मोठी गळती लागली. या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. टाकीजवळ असलेल्या गुरुवार बागेत पाण्याचा अक्षरशः पाट वाहत होता. घटनेची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले.
दरम्यान, दुसऱ्या सत्रात गुरुवार टाकी, वाघाची नळी, जीवनज्योत रुग्णालय, शकुनी गणेश मंदिर, कमानी हौद पिछाडी या भागाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. पालिकेकडून येथील रहिवाशांना तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.
राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा |
सुश्राव्य भजन स्पर्धेमुळे भक्तिरसात न्हाले जावलीकर |
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी 620 एकर जमीन खरेदी केली |
कास पठारावर फुलला सातारीतुरा! |
फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पित्याविरोधात गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन |
वाहनासह साडेतेरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पित्याविरोधात गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन |
वाहनासह साडेतेरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |