04:43pm | Oct 21, 2020 |
सातारा : हददवाढीसह सातारा शहराची पिण्याच्या पाण्याची तहान भागवणार्या कास धरणाचे उंची वाढवण्याच्या कामाचा भाग असलेल्या कास-बामणोलीकडे जाणार्या कास जवळील रस्त्यावर पूल बांधण्यासाठी सातारा नगरपरिषदेच्या वतीने 50 लाखांचा निधी शासनाच्या सार्वजनिक बांधकांम खात्याकडे धनादेशाव्दारे वर्ग केला आहे. कास धरणाची उंची वाढवण्याबाबत सर्वसमावेशक आणि व्यापक लोकहिताचे दूरगामी लाभ देणारे कार्य श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी समयसूचकतेने नुसते सुचवलेच नाही तर त्याकरीता सातत्याने निधी आणि अनुषंगीक बाबींचा पाठपुरावा केल्यामुळेच वेळोवेळी शासनाकडून आवश्यक तो निधी आणि विविध मंजूर्या मिळाल्या ही वस्तुस्थिती आहे. येत्या आठ दिवसात कास धरणाच्या राहिलेल्या 30 टक्के कामास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती जलमंदिर पॅलेस, येथील संपर्क सुत्रांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
सातारा शहराला कोणताही उपसा खर्च न येणार्या कास धरणातून अविरतपणे शुध्द आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा अव्याहतपणे सुमारे 140 वर्षापासून होत आहे. मातीचे पक्के धरणामधून ग्रॅव्हीटीने सुमारे 24 किलोमिटर अंतराच्या उघडया पाटयाने सुरुवातीस आणि सुमारे 25 वर्षापासून बंदिस्त पाईपलाईनव्दारे कासधरणातुन पाणीपुरवठा होत आहे. सदर धरणाची उंची वाढवल्यास, बिनखर्चाचे अहोरात्रपणे वाहणारे पाणी या दूरदर्शी विचाराने, सातारची सन 2040 पर्यंतची लोकसख्या विचारा घेवून कास धरणाची उंची वाढवण्याचे महत्वाचे आणि अतिआवश्यक विकास काम सर्वप्रथम श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनीच प्रस्तावित केले. त्यासाठी लागणार्या सर्व मंजूर्या, आवश्यक निधी याकरीता सातत्याने त्यांनी पाठपुरावा देखिल केला. त्यामुळेच सुमारे 70 ट्नके काम पूर्णत्वाकडे गेलेले आहे.
कास धरणाची उंची वाढवल्याने सध्याच्या सुमारे 107 दशलक्ष घनफुट इतक्या पाणीसाठयाऐवजी सुमारे 500 दशलक्ष घनफूट पाणीसाठी ग्रॅव्हीटी सिस्टीमव्दारे उपलब्ध होणार आहे. त्याकरीता कोणताही उपसा खर्च न होता वाढीव हददीसह सातारा शहराकरीता मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. ही मोठी उपलब्धी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यामुळेच निर्माण झाली आहे. कास उंची वाढवल्याने सध्याच्या कास-बामणेलीकडे जाणार रस्ता हा पाण्याच्या फुगवटयाने बाधित होणार असल्याने, नवीन पर्यायी रस्त्यावर उंच पूल बांधण्यासाठी नगरपरिषदेने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रुपये पन्नास लाखांचा निधी देखिल प्रदान केला आहे. तसेच येत्या आठ दिवसांत कास धरणाची उंची वाढवण्याचे राहिलेल्या 30 टक्के कामास सुरुवात करण्यात येईल आणि मार्च 2021 पर्यंत सदरचे काम पूर्ण करण्याचे, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे नियोजन आहे, अशी माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस येथील जनसंपर्क कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |