09:35pm | Aug 08, 2021 |
फलटण : फलटण तालुक्यातील दुधेबावी येथे असलेल्या मोगराळे घाटात अंधारात दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत एका दुचाकीवर दगडफेक करत दुचाकीस्वाराला हातातील काठ्यांनी मारहाण करत लुटले. या घटनेने वाहनधारकांमध्ये घबराट पसरली असून या संदर्भात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांक्डून मिळालेली माहिती अशी की, दिनांक 8 ऑगस्ट रोजी संचारबंदी असताना रात्री दिड ते दोन वाजण्याच्या सुमारास दुधेबावी येथील मोगराळे घाटात अंधारात दबा धरून बसलेल्या अनोळखी सात ते आठ दरोडेखोरांनी एका ॲक्टिव्हा स्कुटी चालकास व त्याच्या साथीदारास मारहाण करत लुटले आहे. हा अक्टिव्हा स्कुटी चालक दुधेबावी मोगराळे घाटातुन त्याच्या मुळ गावी जात असताना मसोबा मंदिराच्या समोरील वळणावर ॲक्टिव्हा स्कुटी चालका समोर दरोडेखोरांनी हातात काठया घेवुन पळत येऊन गाडी थांबवुन दुचाकी चालकास व त्याच्याबरोबर असणाऱ्या साथीदावर दगडफेक केली. तसेच या दोघांच्या डोक्यावर असलेल्या हेल्मेटवर काठीने जोरात मारहाण करुन त्यांना थांबवुन या दोघांकडील पंधरा हजार रुपये रोख व आयफोन कंपनीचा एक मोबाईल असा एकूण 35 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीनं काढून घेतला. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनीही घटनास्थळी भेट दिली व पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |