03:18pm | Nov 21, 2020 |
सातारा : कराड-सातारा महामार्गावर तळबीड नजिक पेट्रोलिंग करीत असताना बेकायदेशीररित्या गुटखा व पान मसाल्याची वाहतूक करीत असलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या दोघांकडील सुमारे साडेतीन लाखांच्या गुटख्यासह वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या आदेशान्वये सातारा जिल्ह्यात घडणार्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पेट्रोलिंग करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार दि. 20 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे हे पोलीस पथकासह कराड ते सातारा महामार्गावर गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना उमा महेश हॉटेल व लॉजिंग तळबीड ता कराड येथील मोकळया जागेत एक पांढर्या रंगाची फोक्सव्हॅगन कंपनीची पोलो कार क्रमांक एम एच 12 जी सी 506 हि रोड च्या कडेला संशयितरित्या उभी असलेली दिसली. या कारमध्ये दोन इसम बसलेले असल्याचे दिसल्याने त्या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणुन संबंधित कारची झडती घेतली असता त्यामध्ये पांढर्या रंगाची पोती पोलिसांना दिसून आली. त्या पोत्यांमध्ये राज्यात विक्री करण्यास प्रतिबंध असलेला गुटखा/सुगंधी पान मसाला असा एकूण 3 लाख 37 हजार 990 रुपये किंमतीचा माल व वाहन मिळुन आले. म्हणुन संबंधित दोघे व मुद्देमाल हा पुढील कारवाई कामी अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन सातारा यांच्या ताब्यात देण्यात आला आहे
या कारवाईत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस अंमलदार ज्योतीराम बर्गे, अतिष घाडगे, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, अमित सपकाळ, रोहित निकम, सचिन ससाणे, मोहसीन मोमीन, मयुर देशमुख, संजय जाधव, पंकज बेसके यांनी सहभाग घेतला होता.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |