12:48pm | Nov 25, 2022 |
सातारा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदभार स्विकारल्यानंतर शुक्रवारी प्रथमच कराडच्या राजकीय पंढरीत येत आहेत. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत ते त्यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर त्यांचे अनेक शासकीय कार्यक्रम होणार असून दुपारी कराडकरांच्यावतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या राजकीय कार्यक्रमात अनेकजण पक्षप्रवेश करणार असल्याचे बोलले जाते. पण प्रत्यक्षात शिंदे गटाची ढाल तलवार कोण कोण हातात घेणार,? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच कराडला येत असल्याने त्यांच्या भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई स्वत: यामध्ये लक्ष घालून नियोजन करीत आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक आढावा बैठका घेतल्या आहेत. या दौºयात कुठलीही कुचराई राहणार नाही, याची दक्षता देसाई घेताना दिसत आहेत.
कराड दौरा हा ग्रामीण विभागापेक्षा शहराच्या राजकारणात उलथापालथ घडविणारा ठरेल, असे मानले जाते. उद्याच्या जाहिर कार्यक्रमात अनेकजण जाहिर प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते. नक्की कोण कोण बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार,? यावरच कऱ्हाडची राजकीय परिस्थिती नेमकी काय होईल, याचा अंदाज बांधता येईल.
कऱ्हाड येथील यशवंत विकास आघाडीचे प्रमुख राजेंद्र यादव यांनी या नागरी सत्कारासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या आघाडीचे नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेनेत उद्या प्रवेश करतील, अशी चर्चा आहे. पण आघाडीचे सर्व माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार का? हे कळण्यासाठी थोडे थांबावेच लागेल.
शंभूराज देसाईंची छाप
कराडनजीकच्या पाटणचे आमदार, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते, पालकमंत्री शंभूराज देसाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. चार महिन्यापुर्वी झालेल्या सत्ता संघर्षातही देसाई़ंची महत्वाची भुमिका राहिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर पालकमंत्र्यांची छाप दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात अर्धा डझनावर मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, रोजगार मंत्री दादा भुसे आदी या दौºयात येणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्व आहे. पुल म्हणजेच 'सेतू'. सेतू हा नदीपात्राच्या दोन काठांना जोडणारा दुवा असतो. कराड तालुक्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजूर केलेल्या दोन पुलांचे भुमीपुजन होणार आहे. आता दोन पक्षाचे हे नेते विकासाचाच सेतू बांधत आहेत, असेच म्हणायचे का?
युवकाचे अपहरण करून त्याचा खून केलेले संशयित 36 तासात रत्नागिरी येथून जेरबंद |
गर तू मेरा नही हो सका, तो किसी और का होने नहीं दूंगी... |
वाढे फाटा येथील मारेकरी ताब्यात; सूत्रधार कोण? |
दोन लाखांचे दागिने घेऊन कारागीर पळाला |
एकाची 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |
खानापूरच्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून; वाई तालुक्यात खळबळ |
तांब्याच्या तारेची चोरी |
नोकरीच्या आमिषाने तब्बल चार लाख 99 हजाराची फसवणूक |
युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल |
मध्यमवर्गीय, शेतकरी, गोरगरीबांना न्याय देणारा अर्थसंकल्प |