07:09pm | Mar 28, 2023 |
सातारा : निरा-देवघर प्रकल्प व फलटण-पंढरपूर रेल्वेमार्ग प्रकल्प गतीमान केल्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे अभिनंदन केले आहे. मात्र, या दोन्ही कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणार्या विधान परिषदेचे माजी सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकरांना मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाने सणसणीत चपराक बसलेली आहे.
विधान परिषदेचे माजी सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विकासकामांच्या श्रेयवादावरुन कलगीतुरा रंगलेला आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच मिस्टर रामराजे यांनी एका खाजगी यु-ट्युब वाहिनीवर (चॅनेलवर) येवून निरा-देवघर, धोम-बलकवडी संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करीत या संदर्भात या प्रकल्पांच्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला होता. निरा-देवघर नक्की किती टीएमसीचे? याचे उत्तरही मिस्टर रामराजेंना मुलाखतीदरम्यान देता आलेले नव्हते. रामराजेंच्या या यु-ट्युबवरील मुलाखतीचा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सडकून समाचार घेत मिस्टर रामराजेंच्या प्रत्येक प्रश्नांची समर्पक अशी उत्तरे दिली होती. फलटण ची रेल्वे दिवंगत माजी खा. हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी आणली. रेल्वे मंजुर झाली तेव्हा जाफर शरीफ नव्हे तर रामविलास पासवान हे रेल्वेमंत्री होते. मिस्टर रामराजेंना ना पाण्यातील कळते, ना रेल्वेतील, असे म्हणत खा. रणजितसिंहांनी त्यांची खिल्ली उडवली होती. सत्तेसाठी बारामतीकरांची चाकरी करणार्या मिस्टर रामराजेंनी ज्या मतदारांनी त्यांना मते देवून आमदार-मंत्री केले, अशा दुष्काळग्रस्त जनतेला पाण्यासाठी मोताद केले, त्यांची हाय खाल्ली. आज तीच हाय रामराजेंना भोगावी लागत आहे. फक्त विधान परिषदेची आमदारकी गाठीशी असलेल्या रामराजेंची सत्तेविना मती चालायची बंद झालेली आहे. फलटण, माळशिरस तालुक्याच्या हक्काचे पाणी हायड्रोलॉजिकल डेटा बदलून बारामतीकरांच्या झोळीत घातले. कृष्णा पाणी तंटा लवादामधील नियमानुसार एका खोर्यातील पाणी दुसर्या खोर्यात पळवता येत नाही. असे असतानाही मिस्टर रामराजेंनी मंत्री पदाच्या तुकड्याच्या बदल्यात हायड्रोलॉजिकल डेटा बदलून फलटण व उत्तर सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यातील जनतेला भिकेला लावले. आज तेच रामराजे सत्ता नसल्याने फ्रस्ट्रेशनमध्ये आल्याने न केलेल्या कामाचेही श्रेय लाटत असल्याचा आरोपही खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केलेला होता.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निरा-देवघर आणि फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग प्रकल्प गतीमान केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. लोकसभा निवडणुकीदरम्यान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर तसेच भाजपच्या वतीने जी आश्वासने देण्यात आली होती, ती-ती पूर्ण झाल्याची स्पष्टोक्तीही यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान, मिस्टर रामराजेंनी न केलेल्या कामाचे श्रेय घेवून स्वत:चीच पाठ थोपटण्याचा प्रयत्न केला होता. त्याला मात्र फडणवीसांच्या या अभिनंदनाने त्यांना सणसणीत चपराक बसली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |