वाई : लोकमान्य टिळक ग्रंथालयातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मराठी भाषेबद्दल खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये सुरुवातीला सुलभा प्रभूणे यांनी मुक्ति शोधगाथा या डॉ. राजन प्रभुणे यांनी लिहिलेल्या कादंबरीतील उतारा वाचून दाखवला. राहुल तांबोळी यांनी, डॉ. शंतनु अभ्यंकर यांच्या, फादर टेरेसा या पुस्तकातील, नाना हे व्यक्तीचित्र सादर केले.
भाषा संवर्धनासाठी, विविध ज्ञानशाखातील अधिकाधिक माहिती, त्या त्या भाषेत, लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. डॉ. अरविंद संगमनेरकर यांनी, गेली चाळीस वर्ष, शतायुषी हा दिवाळी अंक काढून, वैद्यकीय क्षेत्रातील माहिती जनसामान्यांपर्यंत मराठीतून पोहोचविण्याचे मोठेच काम केलं आहे.
सुधा जाधव यांनी शतायुषी या दिवाळी अंकाची वाटचाल थोडक्यात समजावून सांगितली.
भाषा संवर्धनासाठी भाषांतर हा देखील एक महत्त्वाचा मार्ग आहे. विविध भाषातील ग्रंथसंपदा मराठीत आणताना, त्या त्या भाषेतील काही शब्द आणि संस्कृतिक संकेत आपल्या भाषेत येत असतात. आपली भाषा ही समृद्ध होत असते. याबाबत शेवटी डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे 'केल्याने भाषांतर' याविषयी मांडणी केली. इंग्रजीतून मराठीत साहित्य भाषांतरीत करताना येणाऱ्या अडचणीबद्दल त्यानी सविस्तर माहिती दिली. उत्तम भाषांतरासाठी कशी पूर्वतयारी करावी,काय अभ्यास करावा, आधुनिक संसाधनांचा कसा वापर करावा, हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला बाळासाहेब नायगावकर, भद्रेश भाटे आदी संचालक तसेच नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संचालिका स्मिता कान्हेरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रंथालयाचे सर्व कर्मचारी तसेच अमित वाडकर यांनी विशेष कष्ट घेतले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |