02:34pm | Mar 13, 2022 |
कराड : शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केला असून पाटण मतदारसंघातील बेरोजगारांना शासकीय योजनेतून स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेतला आहे. या योजनेचा भव्य शुभारंभ त्यांच्या संमतीने झाला. या योजनेच्या माध्यमातून सध्या बेरोजगार असणाऱ्या व स्वत:च्या पायावर उभे राहण्याची जिद्द बाळगणाऱ्या तरुणांच्या पंखाना बळ देण्याचे काम गृहराज्यमंत्री ना. देसाई करीत आहेत. पाटण मतदारसंघातील बेरोजगार तरुणांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन युवानेते यशराज देसाईंनी केले.
दौलतनगर, ता. पाटण येथे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत शुभारंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यशराज देसाई म्हणाले, आपल्या तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पहाता मोठे उद्योग उभे राहू शकत नाहीत. मात्र, छोटे-छोटे उद्योग उभे करून त्यामधून व्यवसाय उभे करणे सहज शक्य आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पालेभाज्या, कडधान्यांचे, दुधाचे उत्पादन होते. सध्याचे युग हे मार्केटिंगचे असून कुठलीही वस्तू विकायची झाल्यास आपली वस्तू किती चांगली आहे, याचे मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करणे आवश्यक आहे. उत्पन्नांसाठी चांगले साधन असणाऱ्या चांगल्या योजना ‘माझा व्यवसाय माझा हक्क’ या उपक्रमातंर्गत समावेश आहेत.
या योजनेअंतर्गत पालेभाज्या, कडधान्यांचे, दुधाचे संकलनासाठी गाडी किंवा इतर गोष्टी लवकरात लवकर कर्ज देऊन शासनामार्फत सुमारे 35 टक्कयापर्यंत सबसिडी देऊन अधिक चांगल्या पद्धतीने काम करणे शक्य आहे. ग्रामीण भागांमध्ये काही तरी करण्याची जिद्द आहे त्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा. यामुळे अधिक सक्षमपणे छोटे-मोठे उद्योग आपल्या पाटण तालुक्यामध्ये निश्चितपणे निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच 12 मार्च पासून 25 मार्चपर्यंत फॉर्म स्विकारण्यात येवून आपल्याला कुठल्या व्यवसायामध्ये काम करण्याची इच्छा आहे. त्याचे पूर्ण मार्गदर्शन करुन सगळे सहकार्य साहेबांच्या कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. या योजनेत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन त्यांनी केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |