09:57pm | Jan 25, 2022 |
सातारा : मुंबई येथे म्हाडा प्रकल्पामध्ये अधिकारी असल्याचे भासवून त्याअंतर्गत फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून, ९९ लाख ८४ हजार रुपयांची फसवणूक करून तीन वर्षापासून मिरारोड, मुंबई येथून फरार असणाऱ्या संशयिताला सातारा येथील ताब्यात घेण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. अरुण गणपत शिंदे वय ५२, मुळ रा. माणगाव, जि. रायगड, सध्या रा. मिरारोड, मुंबई असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी मिरारोड, मुंबई येथे राहणाऱ्या अरुण गणपत शिंदे हा मुंबई येथे म्हाडा प्रकल्पामध्ये अधिकारी असल्याचे भासवून त्या अंतर्गत फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून, विविध लोकांची ९९ लाख ८४ हजार रुपयांची फसवणूक करत तीन वर्षात पासून फरार झाला होता. वेगवेगळे फसवणुकीचे गुन्हे दाखल असणारा हा संशयीत सातारा शहर परिसरात येणार असल्याची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पुणे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला सूचना करून अरुण शिंदे याला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून त्याला सातारा येथून ताब्यात घेतला.
अरुण शिंदे याच्यावर मिरारोड, जोगेश्वरी, रबाळे येथील पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. पुढील कार्यवाहीसाठी त्याला ताब्यात घेण्यासाठी मिरारोड येथील पोलीस पथक साताराकडे रवाना झाले आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक समीर कदम, पोलीस नाईक सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम बर्गे, अभय साबळे, गणेश घाडगे, संतोष कचरे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ यांनी सहभाग घेतला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |