07:56pm | Mar 18, 2023 |
सातारा : महाराष्ट्र शासनाने ‘‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार’’ प्रदान करून गौरविलेल्या व शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्या ‘श्री जानाई मळाई सोशल ऍन्ड एज्युकेशनल फौंडेशन (जेमसेफ) सातारा’ संस्थेचे संस्थापक समाजभूषण-दलितमित्र स्व.शिवराम लक्ष्मण माने (गुरूजी) यांचा 90 वा जयंती सोहळा, तसेच मोफत सर्वरोग निदान शिबीर आदी कार्यक्रम संस्थेच्या मुख्य कार्यालयाशेजारी, माने कॉलनी सातारा या ठिकाणी कोरेगांव-खटाव विधानसभा मतदारसंघाचे आ. महेश शिंदे यांच्या पत्नी डॉ.सौ.प्रिया शिंदे यांच्या हस्ते, जि. प. साताराचे माजी उपाध्यक्ष रवि साळुंखे, माजी जि.प. सदस्य संदिप शिंदे, माजी जि.प.सदस्य बाळासाहेब काटे, संस्थेचे सचिव संजीव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्व. शिवराम माने (गुरूजी) यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे माजी संस्थापक-संचालक, संस्थेचे हितचितक-मार्गदर्शक-आधारस्तंभ, स्वा.सै.स्व.बाबुराव जंगम गुरूजी यांचे सुपूत्र माजी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी शिरिष जंगम यांची समर्थनगर गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल तसेच संस्थेने आयोजित केलेल्या सर्वरोग निदान शिबीरामध्ये सहभागी झाल्याबद्दल तज्ञ डॉक्टर्स व नर्स यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे खजिनदार व समाजभूषण-दलितमित्र शिवराम माने विदयामंदिर माने कॉलनी, सातारा शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे यांची कन्या कु. श्रृती काळे हिने संस्थापकांच्या रेखाटलेल्या चित्राचे तसेच कै.रामराव निकम शिक्षणशास्त्र महाविद्यालय इंदोलीच्या छात्राध्यापकांनी आंतरवासिता शिबिरामध्ये तयार केलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आयोजित केलेल्या सर्व रोग निदान शिबीरामध्ये एम.डी.व एम.बी.बी.एस. पदवीधारक तज्ञ व अनुभवी डॉक्टर्स सहभागी झाले होते. शिबिरात सहभागी डॉक्टरांनी मधूमेह, मेंदुरोग, किडनी विकार, पोटविकार, अस्थिरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा, स्त्रीरोग, फिजिओथेरपिस्ट आदि आजारांसाठी मार्गदर्शन व वैद्यकीय सल्ला दिला. तसेच यावेळी मोफत ईसीजी व हिमोग्लोबीन, शुगर बाबत रक्त तपासणी करण्यात आली.
या सर्वरोग निदान शिबीरामध्ये कोडोली, संभाजीनगर, समर्थनगर, खिंडवाडी, देगांव, जैतापूर, निगडी, विलासपूर, अहिल्यानगर, गावातील सुमारे 821 नागरिकांनी उस्फुर्तपणे सहभाग घेवून शिबिराचा लाभ घेतला. तसेच असा समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेचे सचिव संजीव माने यांचे आभारही मानले.
या प्रसंगी विविध मान्यवरांची समोयोचित भाषणे झाली. या वेळी बोलताना डॉ.सौ.प्रिया शिंदे म्हणाल्या, ‘‘स्व.शिवराम माने (गुरूजी) यांनी निव्वळ शैक्षणिक क्षेत्रातच कार्य न करता समाजासाठी उपयुक्त अनेक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविले आहेत. ही संस्था नेहमीच समाजाला दिशा देणारे आदर्श उपक्रम राबविते. सध्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत ज्वलंत असणारा रासायनीक खतावर पिकवलेला भाजीपाला आरोग्यास किती घातक आहे व सेंद्रीय शेती आरोग्यास किती लाभदायक आहे. याची सविस्तर माहिती देवून प्लास्टीकचे दुष्परिणाम यावर सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले, त्याचप्रमाणे सेंद्रीय शेती व प्लॅस्टीक निर्मुलनाचे महत्व देखील विशद केले. संस्थेने याबाबत उपक्रम राबवावा असे आवाहन देखील केले.
संस्थेचे सचिव संजीव माने यांनी शिबिराचे प्रयोजन विशद केले. याचबरोबर ते म्हणाले, आमच्या वडिलांनी दाखवलेल्या आदर्शांवर संस्थेची वाटचाल अत्यंत समाधानकारकरित्या सुरु आहे. यापुढेही त्यांचेच आदर्श डोळ्यासमोर ठेवून ही वाटचाल सुरु राहील. याचबरोबर त्यांनी संस्थेच्या प्रगतीत सहकार्य करणार्यांचे आभारही मानले.
कार्यक्रमास खेड ग्रा.पं.चे माजी सरपंत्र शामराव माने, संभाजीनगर ग्रा.पं.चे माजी सरपंच सतिश माने, समर्थनगर ग्रा.पं.च्या माजी सरपंत्र सौ.मालन लोखंडे, अहिल्यानगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदकुमार माने, बोरणे ग्रा.पं.चे सरपंच अशोक कदम, कुसवडे ग्रा.पं.चे माजी सरपंच सुनिल महाडीक, उपसरपंच विश्वनाथ सराटे, खेड ग्रा.पं.सदस्य कांतीलाल कांबळे, प्रविण धस्के, बी.आर.राजे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य उपस्थित होते.
परिसरातील नागरिक व पालकांनी मोठया संख्येने शिबिरामध्ये सहभागी होवून संस्थेने राबविलेल्या उपक्रमांबद्दल व नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतिभा जाधव, प्रास्ताविक दत्तात्रय काळे यांनी केले. आभार वैशाली भिसे यांनी मानले.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |