10:34pm | Oct 17, 2020 |
सातारा : शनिवारी जिल्ह्यात 7 बाधितांचा मृत्यू झाला, तर 278 बाधितांची नोंद करण्यात आली. तसेच 698 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 372 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात मृत्यूदर आणि बाधितांची आकडेवारी कमी होत असल्याने जिल्हावासियांमध्ये आशा निर्माण झाली आहे. जिल्ह्यात शनिवारी 7 बाधितांचा मृत्यू झाल्याने एकूण कोरोनाबळींची संख्या 1 हजार 422 वर पोहोचली आहे. तर, 278 बाधित निष्पन्न झाल्याने एकूण बाधितांची संख्या 43 हजार 511 वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 698 नागरिकांना घरी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या 36 हजारांचा आकडा ओलांडत 36 हजार 397 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर 372 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून जिल्ह्यातील 5 हजार 414 बाधितांवर उपचार सुरु असल्याचीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
7 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या दुर्गा पेठ, ता. सातारा येथील 57 वर्षीय महिला, कुसुंबी ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, खटाव येथील 62 वर्षीय पुरुष, रविवार पेठ सातारा येथील 90 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध हॉस्पिटलमध्ये पाटखळ ता. सातारा येथील 78 वर्षीय पुरुष, व्याजवाडी ता. वाई येथील 75 वर्षीय पुरुष, म्हसवड, ता. माण येथील 65 वर्षीय महिला अशा एकूण 7 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
372 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 34, कराड येथील 10, फलटण येथील 20, कोरेगाव येथील 45, वाई येथील 21, खंडाळा येथील 20, रायगाव येथील 43, पानमळेवाडी येथील 66, महाबळेश्वर येथील 10, दहिवडी येथील 17, खावली येथे 18, पिंपोडे येथील 4 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 64 असे एकूण 372 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |