11:53pm | Jun 29, 2022 |
सातारा : सातारा जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट साडेतीन टक्के वर पोहोचला असून जिल्ह्यामध्ये एक्टिव 75 पेशंट असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि वारंवार हात धुणे इत्यादी उपायांचा विसर नागरिकांनी पडू देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आगमन झाले असून जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सध्या लोणंद नगरीमध्ये स्थिरावली आहे. अशा पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. मंगळवारी पेशंटची संख्या पंधरा होती, तर बुधवारी ती वाढून 26 वर पोहोचली आहे. बरेच रुग्ण हे होम आयसोलेशन मध्ये असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. तरीही नागरिकांनी फार गाफील न राहता चुकूनही शंका आल्यास तातडीने टेस्ट करून घ्यावी, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी सांगितले आहे.
जर साथी चा संसर्ग वाढलाच तर 14 बेडचे दोन वार्ड आणि अतिदक्षता कक्षामध्ये 10 बेड असे एकूण 38 बॅड या रुग्णांसाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. गेल्या पंधरा दिवसांमध्ये वाई वरून आलेल्या 75 वर्षीय एका वृद्धेचा केवळ मृत्यू झाला आहे. ही वृद्ध असल्यामुळे शरीर प्रक्रियेत गुंतागुंत निर्माण होऊन त्या वृद्धेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर चव्हाण यांनी सांगितले. काही आठवड्यांपूर्वी कोरोना संक्रमण दर पॉइंट फाईव्ह होता. तो आता वाढत वाढत साडेतीन टक्के वर पोहोचला आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आगमन झाले आहे. त्यामुळे कदाचित हा पॉझिटिव्हिटी रेट वाढू शकतो. नागरिकांनी फार गर्दीत न जाता स्वतःची काळजी घ्यावी. ज्यांची बूस्टर डोस राहिली असेल त्यांनी ते तात्काळ पूर्ण करून घ्यावेत. तसेच rtpcr लॅब स्वतंत्रपणे सुरू ठेवण्यात आली असून तेथे जादा कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यामुळे टेस्ट आणि लसीकरण यावर नागरिकांनी जास्तीत जास्त भर द्यावा, असे आवाहन डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |