सातारा : रेमडेसिवीर चा काळाबाजार करणार्या टोळीच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्यानंतर त्यांच्याकडून या इंजेक्शनचे तारळे कनेक्शन उघड झाले आहे. मात्र, या सर्वांना हे इंजेक्शन कुठून मिळत होते, सध्या याची त्यांच्याकडे चौकशी चालू असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी सांगितले.
रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा काळा बाजार होत असल्याची माहिती फलटण पोलिसांना मिळाल्यानंतर, पोलिसांनी तातडीने सापळा रचून संबंधित सुविधा हॉस्पिटल फलटण येथील कंपाउंडरला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता या रॅकेटमधील आणखी तीन आरोपी निष्पन्न झाले. त्या सर्वांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांना या इंजेक्शनचा पुरवठा सातारा येथील कुलकर्णी आणि तारळे ता. पाटण येथील लाहोटी या इसमांकडून मिळत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत, मानसी हॉस्पीटल, तारळे ता.पाटण येथील अरुण जाधव यांच्याकडून पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, त्यांनाही या प्रकरणी अटक करण्यात आले असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी सांगितले.
रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजाराच्या अनुषंगाने त्या इंजेक्शनच्या लॉट मधील बॅच नंबर, मॅच करून नेमके त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनचा कुठून पुरवठा होत आहे, याबाबत तपास चालू आहे. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार बाबत कोणालाही, कोणतीही माहिती असेल, तर तातडीने पोलीस स्टेशनला संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |