04:31pm | Apr 21, 2022 |
फलटण : दिगंबर आगवणे याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होत असून न्यायालयाच्या आदेशाने फलटण पोलिसात तक्रारी दाखल होण्याची मालिका सुरु असताना आता स्वराज सहकारी साखर कारखानाच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची बदनामी केल्याप्रकरणी समोर आलेल्या तक्रारीतील कागदपत्रे, पुरावे व साखर कारखान्यातर्फे मांडण्यात आलेल्या युक्तीवादानंतर न्या. वैद्य यांनी आगवणे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, फलटण येथील न्यायाधीश वैद्य मॅडम यांच्या कोर्टामध्ये स्वराज ग्रीन पॉवर अँड लिमिटेड उपळवे (लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखाना) तर्फे अनिलकुमार तावरे व रोहित नागटीळे यांनी फिर्याद दाखल केली होती. सदर फिर्यादीमधील उपलब्ध कागदपत्रे पुरावे व फिर्यादी यांचे जाब जबाब घेऊन तसेच वकिलांचा युक्तिवाद ऐकून मेहेरबान न्यायालयाने यामधील आरोपी दिगंबर आगवणे याचे विरुद्ध गुन्हा सिद्ध होत असल्याचे तसेच आगवणे यांनी कारखान्याकडून बगॅस प्रेस मेड इत्यादी माल खरेदी करून देखील सदर माला वरती कारखाना यांनी शासनाकडे जीएसटी देखील भरलेला असून या व्यवहारा बाबत सर्व कागदोपत्रे पुरावे कारखान्याकडे उपलब्ध असल्याने माल मिळालाच नाही व खोटी बिले मारली असा बनावा दिगंबर आगवणे केला.
सदर माल मे. आयुर ट्रेडर्स वाठार निंबाळकर येथे गोडाऊन मध्ये ठेवलेला होता. सदर गोडाऊनला 2018 साली आग लागलेली होती व आगीमध्ये कारखान्यांकडून खरेदी केलेला माल जळाला याची जळीत फिर्याद देखील आयुर ट्रेडस तर्फे अभिजित जाधव यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिली होती. या माला वरती आगवणे यांनी इन्शुरन्स देखील काढलेला होता. सदर इन्शुरन्स कंपनीकडे त्यांनी माल जळाला असल्याने नुकसान भरपाई बाबत इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम देखील केला होता. म्हणजे स्वराज कारखान्याकडून माल खरेदी करायचा त्यावर तो कारखाना जीएसटी देखील भरायचा. सदर माल आपल्या गोडाउन मध्ये ठेवायचा मालजळीत झाला म्हणून रितसर पोलीस स्टेशन येथे फिर्याद द्यायची करोडो रुपयाचा इन्शुरन्स क्लेमदेखील मागणी करायचा आणि काही दिवसांनी मी माल घेतलाच नाही असे सांगून कारखान्याचे कायदेशीर देणे असलेले पैसे बुडवण्याच्या हेतूने उपोषण करायचे आणि प्रशासनावर दबाव निर्माण करायचा तसेच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची खोटी बदनामी करायची, असे प्रकार आगवणे याने केले होते.
याबाबत आगवणे विरुध्द न्यायालयात दाखल झालेल्या तक्रारीची दखल घेत फलटण न्यायालयाने तक्रारीसह दाखल केलेल्या तक्रारी, पडताळणी आणि कागदपत्रांचा अभ्यास केला. तक्रारदाराचे अधिवक्ता ए.बी. कदम हे ऐकले. रेकॉर्डवरील पुराव्यांचा अभ्यास केल्यावर असे दिसून येते की, भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 467, 468 आणि 500 अंतर्गत प्राथमिक गुन्हे आरोपी व्यक्तींविरुद्ध केले आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 1 आणि 2 अन्वये/सेक. 420, 465, 467, 468 आणि 500 आरोपींविरुद्ध फौजदारी संहिता कलम 204 द्वारे आदेश जारी करण्याची प्रक्रिया 1 प्रक्रिया 2 प्रकरण R.C.C म्हणून नोंदवले जावे. असे लेखी आदेश फलटण न्यायालयाने दिले आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |