सातारा : सातारा जिल्ह्यात काल दिवसभरात विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या ४० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच ३ कोरोना संशयितांचा मृत्यू झाला असून त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील बाधितांचा आकडा आता ५५६ पर्यंत पोहोचला आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण चांगले असले तरी कोरोना बाधितांची संख्याही वाढत असल्याने धास्ती कायम आहे. दरम्यान आज पर्यंत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 200 झाली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.
काल सकाळी ५ जणांच्या तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये पाटण तालुक्यातील नवसरवाडी येथील १ (६० वर्षीय पुरुष), वाई तालुक्यातील वोव्हाळी येथील १ (४२ वर्षीय पुरुष), जांभळी येथील १ (११ वर्षीय मुलगी), महाबळेश्वर तालुक्यातील कोट्रोशी येथील १ (१० वर्षीय मुलगी) व हरचंदी येथील १ (६३ वर्षीय पुरुष) अशा एकूण ५ रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यानंतर काल सायंकाळी आणखी १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यासह जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ५३८ वर जावून पोहोचला. या १७ बाधित रुग्णांमध्ये फलटण तालुक्यातील बरड येथील ५५ वर्षीय महिला, वडाळे येथील ३५ वर्षीय पुरुष, जावली तालुक्यातील कावडी येथील ५२ वर्षीय महिला, कळकोशी येथील ४१ वर्षीय पुरुष, केळघर (सोळशी) येथील ३९ वर्षीय महिला, कराड तालुक्यातील विंग येथील ४३ वर्षीय महिला, १९ वर्षीय तरुण, पाटण तालुक्यातील काळेवाडी येथील २१ वर्षीय महिला, नवसरवाडी येथील २५ व २२ वर्षीय युवक, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील ७२ वर्षीय महिला, खटाव तालुक्यातील अंभेरी येथील ३ व ६ वर्षीय बालिका, २९ वर्षीय पुरुष, महाबळेश्वर तालुक्यातील हरचंदी येथील ५३ वर्षीय महिला, गोरोशी येथील ७२ वर्षीय महिला, वाई ग्रामीण रुग्णालयातील २४ वर्षीय महिला आरोग्य सेवक यांचा समावेश आहे.
दरम्यान काल रात्री उशिरा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन १८ रुग्ण सापडले असून यामध्ये कराड तालुक्यातील वानरवाडी 4, पाटण - जांभेकरवाडी 1, वाई - दह्याट 1, महाबळेश्वर - हरचंदी 1, कासवंड - 3, सातारा - कुस ( बु.) -2, जावळी - रांजणी 1,आंबेघर 1,खंडाळा - शिरवळ - 1, माण - पिंपरी - 3 असे नव्याने १८ रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ५५६ वर पोहचली आहे.
मुंबईवरुन आलेल्या व घरीच क्वारंटाईन असलेल्या बोपेगांव (ता. वाई) येथील रक्तदाबाचा त्रास असलेल्या ८५ वर्षीय महिला, सारीचा आजार असलेली गिरवी (ता. फलटण) येथील ६५ वर्षीय महिला व १५ वर्षांपूर्वी कर्करोगाने आजारी असलेला २९ मे रोजी मुंबई येथून आलेला ५२ वर्षीय पुरुष अशा ३ जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यू पश्चात त्यांच्या घशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |