04:13pm | Jun 29, 2022 |
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पुढचा अंक आता विधानसभागृहात होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र बहुमत चाचणीत पराभवाला सामोरं जाऊन नाचक्की करुन घेण्याऐवजी उद्धव ठाकरे आधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, अशी अटकळ बांधली जात आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर काँग्रेससोबत मतभेद झाल्याच्या कारणावरुन ठाकरे पद सोडणार असल्याचा दावा केला जात आहे.
शिवसेनेतील बंडाळीनंतरही एकजूट राखत महाविकास आघाडी टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा सत्ताधारी पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करावे, असा प्रस्ताव आज मंत्रिमंडळ बैठकीसमोर येणार आहे. त्याला काँग्रेस विरोध करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. तसे झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारीच या मुद्द्यावरून राजीनामा देण्याची शक्यता असल्याची चर्चा महाविकास आघाडीतील वरिष्ठ वर्तुळात आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी कॅबिनेट बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला असता बुधवारी यासाठी पुन्हा मंत्रिमंडळ बैठक बोलावण्याचे निर्देश देण्यात आले. काँग्रेस नेते अशोक चव्हाण, नितीन राऊत, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांनी मातोश्रीवर जाऊन यासंदर्भात बातचित केली. यानंतर या मुद्द्यावरून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिल्लीतील हायकमांडशी चर्चा केली. यात या नामांतराला पक्षाने विरोध करावा, असे निर्देश त्यांना देण्यात आल्याचे समजते.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, यामागे मोठी राजकीय रणनीती असून काँग्रेस पक्षाशी मतभेद झाल्याचे दाखवत ठाकरे आपल्या पक्षातील आमदारांसोबत एकत्र येण्याचीही शक्यता आहे. तसे झाल्यास राज्यात पुन्हा शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर येईल व देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील. तर उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुखाच्या भूमिकेत दिसतील, अशी चर्चा महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये काल रात्रीपासून सुरू झाली आहे.
बंडाला सडेतोड उत्तर देण्यासाठी शिवसेनेने ही अचूक वेळ साधली
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर करण्यावरुन वादविवाद सुरु आहेत. विरोधकांसह अनेक राजकीय पक्षांनी या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांपूर्वीच झालेल्या शिवसेनेच्या सभेतही यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले होते. त्यानंतर आता सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि एकनाथ शिंदे गटाच्या बंडाला सडेतोड उत्तर देण्यासाठी शिवसेनेने ही अचूक वेळ साधली. मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत यासंदर्भातील सूचना शिवसेनेचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली. त्यानंतर तातडीने सूत्रे हलविण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव बुधवारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्यासंदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |