02:59pm | Apr 16, 2021 |
सातारा: सातार्यातील फेरीवाल्यांचे आवश्यक ते सर्वेक्षण यापूर्वीच झालेले आहे. फेरीवाल्यांप्रती सहानुभुतीमुळे टिका करणार्यांनी याबाबतची थोडीतरी माहिती घेतली असती तर वस्तुस्थिती त्यांना समजली असती. सध्याच्या कोरोनाच्या भीषण परिस्थितीत, अकारण संभ्रमावस्था निर्माण होण्यास हातभार न लावता, आवश्यक असेल तेथे संबंधितांनी प्रशासनास यथोचित सहकार्य करावे अशी, आमची सर्वाना विनंती राहिल, अश्या स्पष्ट शब्दात खुलासा करताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी फेरीवाल्यांसह गोरगरिब नागरीक आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांना पात्र लाभ देण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही असे आश्वस्त उद्गार एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे व्यक्त केले आहेत.
सातारा नगरपरिषदेच्या निष्काळजीपणामुळे फेरीवाल्यांचे नुकसान अशा मथळ्याखाली प्रसिध्द झालेल्या वृत्ताचे साधार खंडन करताना, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, सातारा नगरपरिषद आणि फेरीवाला संघटना यांच्या संयुक्त माध्यमातुन सातारा शहरातील 1621 पथविक्रेत्यांच्या सर्वेक्षणाचे काम यापूर्वीच पूर्ण झालेले आहे. त्यापैकी मा.पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेमधुन सन 2020-21 मध्ये 754 पथविक्रेत्यांचे खात्यात रुपये 10 हजारांची रक्कम थेट जमा करण्यात आलेली आहे. तर या व्यतीरिक्त 867 फेरीवाल्यांची प्रकरणे मंजूर असून, रक्कम प्रदान करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत. मा.मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली रुपये 1500/- ची फेरीवाला मदत संबंधीत पात्र पथविक्रेत्यांना प्रदान करण्यात कोणतीही समस्या उद्भवणार नाही. याकामी शासनाचे निर्देश ज्या प्रमाणे प्राप्त होतील त्यानुसार
फेरीवाल्यांना रुपये 1500/- नुकसान रक्कम सातारा नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रदान केले जातील.
सध्याची आपत्कालीन परिस्थिती पहाता, टिका करणार्यांना नीट माहिती मिळाली असती त्यांनी अशी टिका केली नसती हे आम्ही जाणतो. म्हणूनच केलेल्या टिकेला सकारात्मकतेने खुलासा वजा माहीती देत आहोत असे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. तसेच राज्यशासनाने रुपये 1500/- रुपयांची घोषित केलेली रक्कम तुटपुंजी असली तरी दिलासा देणारी आहे. म्हणूनच त्या रक्कमेत सातारा नगरपरिषदेच्या स्व निधिमधुन आणखीन रक्कम रुपये 1000/- प्रतिफेरीवाला देण्याबाबत आम्ही धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
फेरीवाल्यांप्रती पारदर्शी धोरण राबविणेत येणार आहे. कोरोनाच्या कठीण पार्श्वभुमीवर प्रसंगी सातारा विकास आघाडीच्या व्यक्तीगत स्तरावरुन देखील शासन घेाषणेप्रमाणे आर्थिक मदत दिली जाईल असे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.
फेरीवाल्यांचे सर्वेक्षण यापूर्वीच झालेले असल्याने, शासन घोषणेप्रमाणे आणि निर्देशाप्रमाणे रुपये 1500/- आणि नगरपरिषदेचे रुपये 1000/- अशी दिलासा रक्क्म पात्र फेरीवाल्यांना लवकरच प्रदान केली जाईल. कोणतीही पात्र व्यक्ती आर्थिक मदतीपासून वंचित राहणार नाही असेच धोरण नगरपरिषदेच्या स्तरावर राबवले जाणार आहे. त्याबद्दल कोणीही संभ्रम करुन घेवू नये असे देखिल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भासले यांनी शेवटी नमुद केले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |