11:23pm | Sep 19, 2020 |
सातारा : शनिवारी जिल्ह्यात 977 जण बाधित निष्पन्न झाले असून 21 जणांचा कोरोनाने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनातून बरे झाल्याने 809 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला. याचबरोबर 921 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
बाधितांच्या आकड्यात नियमित वाढ होतानाचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील बहुतांशी गावांनी जनता कर्फ्यू पाळला आहे. तरीही वाढणारी बाधितांची संख्या प्रशासनाची चिंता वाढवत आहे. शनिवारी जिल्ह्यात 977 बाधितांची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 30 हजारांच्या पार म्हणजेच 30 हजार 92 वर पोहोचला आहे. तसेच 21 जणांचा कोरोनाने उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या 828 वर पोहोचली आहे. शनिवारी जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 809 नागरिकांना घरी सोडण्यात आले. यामुळे कोरोनामुक्तांची संख्या 19 हजार 866 वर पोहोचली आहे. तसेच 921 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
21 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या मर्ढे सातारा येथील 52 वषी्रय पुरुष, सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, वाई येथील 55 वर्षीय महिला, नागपूर येथील 37 वर्षीय पुरुष, लिंब ता.सातारा येथील 70 वर्षीय महिला, हरपळवाडी ता. कराड येथील 54 वर्षीय पुरुष, निनाम पाडळी ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, उरुळ ता. पाटण येथील 46 वर्षीय पुरुष, ल्हासूर्णे ता. कोरेगाव येथील 54 वर्षीय पुरुष, बांबवडे ता. पाटण येथील 55 वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पीटल मध्ये सुर्यनगरी, बारामती येथील 70 वर्षीय पुरुष, निरगुंडी ता. फलटण येथील 80 वर्षीय महिला, ताटवडा ता. फलटण येथील 41 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 37 वर्षीय पुरुष, जाधववाडी ता. फलटण येथील 73 वर्षीय पुरुष, भाटवडे ता. पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, यादोगोपाळ पेठ सातारा येथील 84 वर्षीय पुरुष, निरगुंडी ता. फलटण येथील 80 वर्षीय पुरुष, केसरकर पेठेतील घोरपडे कॉलनी सातारा येथील 48 वर्षीय पुरुष, तसेच कोरेगाव येथील 36 वर्षीय महिला, कटापूर येथील 90 वर्षीय पुरुष अशा एकूण 21 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
921 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 17, उपजिल्हा रुग्णालय कराड 14, उपजिल्हा रुग्णालय फलटण 51, कोरेगाव 22, वाई 138, खंडाळा 77, रायगांव 141, पानमळेवाडी 102, मायणी 65, महाबळेश्वर 40, दहिवडी 42, खावली 23, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 189 असे एकूण 921 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |