06:57pm | May 27, 2023 |
सातारा : सातारा एमआयडीसी येथील वेदांत इलेक्ट्रिकल कार्पोरेशन व विपुल इंटरप्राईजेस येथे तांब्याच्या तारा चोरीचा गुन्हा घडला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सखोल माहिती द्वारे सहा महिला आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तांब्याच्या 888 किलो वजनाच्या विटा व 11 बॅटरी असा सहा लाख सात हजार दोनशे रुपयांचा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी हा माल विकत घेणार्या प्रमोद किसन आंदेकर राहणार करंजे सातारा यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी, सातारा औद्योगिक वसाहतीतील वेदांत इलेक्ट्रिकल कार्पोरेशन आणि विपुल इंटरप्राईजेस येथे तांब्याच्या तारा चोरीचा गुन्हा घडल्याची माहिती 24 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली होती आणि हा गुन्हा काही महिलांनी केल्याची माहिती खबर्याद्वारे मिळाली. अरुण देवकर यांनी या तपास कामी पथक तैनात करून पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांना तात्काळ तपासाच्या सूचना दिल्या. पोलिसांनी संबंधित सहा महिलांना गुन्ह्याच्या तपास कामी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्यांनी वरील दोन ठिकाणी गुन्हा केल्याचे कबूल केले.
त्यांनी या चोरीतील तांब्याच्या तारा ज्या दुकानदारास विकल्या त्याच्याकडून 888 किलो वजनाच्या पाच लाख 777 हजार दोनशे रुपये किमतीच्या तांब्याच्या धातूच्या विटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. तसेच दुसर्या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या तीस हजार रुपये किमतीच्या अकरा बॅटरी सुद्धा हस्तगत करण्यात आल्या आहेत. असे एकूण दोन चोरीचे गुन्हे स्थानीक गुन्हे शाखेने उघड करून सहा लाख सात हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
या तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रवींद्र बोरे, विश्वास शिंगाडे, उपनिरीक्षक अमित पाटील, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, शिवाजी गुरव, दिपाली यादव, मोना निकम, शकुंतला सणस, अनुराधा सणस, तृप्ती मोहिते, दिपाली नामदे यांनी सहभाग घेतला होता.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |