01:41pm | Sep 24, 2022 |
सातारा : भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी संपूर्ण जिल्ह्यात भाजपचे रान तापवले असतानाही सातारा जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेस थंड होती. मात्र, विरोधी पक्षनेते आ. अजितदादा पवार यांनी गुरुवारी जिल्ह्यातील पदाधिकार्यांना कानपिचक्या दिल्यानंतर झोपलेली राष्ट्रवादी खाडकन उठली. राष्ट्रवादी भवनात शुक्रवारी दुपारीच सर्व नेते व पदाधिकार्यांची बैठक होऊन तालुकानिहाय मेळावे घेण्याचे नियोजन झाले. राज्य व केंद्र सरकारच्याविरोधात रणशिंग फुंकतानाच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणखी भक्कम करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
सोळशीच्या कार्यक्रमात अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांचे, पक्ष संघटनेतील पदाधिकार्यांचे नाव घेऊन कान टोचले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस भवनात शुक्रवारी पदाधिकार्यांची तातडीची बैठक झाली. या बैठकीस विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक-निंबाळकर, खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, प्रभाकर देशमुख, शिवाजीराव महाडिक, दत्तानाना ढमाळ, प्रदिप विधाते, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, बाळासाहेब सोळसकर, सत्यजित पाटणकर, सारंग पाटील उपस्थित होते.
यावेळी पदाधिकार्यांनी तालुकानिहाय सभासद नोंदणी अभियान आढावा घेतला. विधानसभा बुथ बांधणी झाली असली तरी आणखी चांगल्या पध्दतीने बुथबांधणी करा. तालुकानिहाय पक्षवाढीसंदर्भात आणखी काय करता येईल त्यादृष्टीने नियोजन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. दि. 15 ऑक्टोबरपर्यंत सभासद नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे. दरवर्षी जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असतो. याहीवर्षी तसेच काम झाले पाहिजे, अशा सूचना सुनील माने यांनी दिल्या. बैठकीस सतीश चव्हाण, किरण साबळे-पाटील, राजकुमार पाटील, निवास शिंदे यांच्यासह तालुक्यातील निवडक पदाधिकारी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |